Arrested For possession, sale of drugs Pudhari
ठाणे

Kalyan Drugs Racket Case: कल्याण- डोंबिवलीतील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन, मंत्र्याच्या निकवर्तीयाला अटक

Karnataka Minister Close Aide Arrested: तिघा तस्करांकडून कोडेन फॉस्फेटच्या 120 बाटल्या हस्तगत; आरोपींमध्ये राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष

पुढारी वृत्तसेवा

Karnataka Minister Close Aide Arrested in Kalyan Drugs Case

डोंबिवली : अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तिघांपैकी एकजण कर्नाटक राज्यातील एक राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे कल्याणच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्यानंतर राजकारण्यांचाही अंमली पदार्थ तस्करीत थेट संबंध असल्याचे उजेडात आले आहे.

कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी गेल्या महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोडेन फॉस्फेट सिरप या प्रतिबंधित अंमली पदार्थांची तस्करी करताना तीन जणांना रंगेहाथ अटक केली होती. या तिघांकडून कोडेन फॉस्फेट सिरपच्या 120 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील लिंगराज कन्नी उर्फ अपराय आलगुड (40) हा आरोपी कर्नाटक राज्यातील आमदार आणि मंत्र्याच्या मर्जीतला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या उदयनगर भागातील न्यू जेवरगी परिसरात असलेल्या अलिशान वस्तीत राहणारा लिंगराज उर्फ अपराय आलगुड हा एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

गेल्या महिन्यातील रविवारी 22 तारखेला मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील बकरी मंडईकडे जाणार्‍या रस्त्यावर तौसिफ आसिफ सुर्वे (34, रा. गोविंदवाडी, कल्याण), लिंगराज कन्नी उर्फ अपाराय आलगुड (40, रा. कलबुर्गी, कर्नाटक) आणि इरफान उर्फ मोहसीन इब्राहीम सय्यद (34, रा. गुलबर्गा, कर्नाटक) हे तिघे संशयास्पदरित्या कोणाचीतरी वाट पाहत असताना पोलिसांना आढळून आले.

अंगझडती घेतली असता या त्रिकूटाकडे Codeine Phosphate Triprolidine Hcl. Syrup -NREX COUGH SYRUP या नावाचे लेबल असलेल्या 100 मिलीच्या एकूण 120 सिलबंद बाटल्या सापडल्या. 27 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिघांच्या विरोधात हवालदार अमित शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार एनडीपीएस कायद्याचे कलम 8 (क), 22 (क) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत 1945 चे नियम कलम 18 (क), 18 (अ), 27 (अ), 28 अन्वये गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुळशीराम राठोड या प्रकरणाचा चौकस तपास सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT