Pithori Puja plants pudhari photo
ठाणे

Pithori Puja plants : पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणाऱ्या वनस्पतींवर शहरीकरणाचा फटका

जंगलतोडीमुळे पूजनासाठी पिठोरीसाठी लागणाऱ्या वनस्पती काळाच्या ओघात लुप्त

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

श्रावण महिन्यात येणारी आमावस्या ही पिठोरी आमावस्या या नावाने ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीच्या भागात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठोरी देवीची विधिवत पूजन करून व्रत पूर्ण केले जाते. वंश वृद्धीसाठी आणि संतती प्राप्तीसाठी पिठोरी मातेचे पूजन केले जाते. त्यामुळे या पिठोरी अमावास्येला मातृ दिन या नावाने सुद्धा ओळखले जाते. मात्र वाढत्या शहरिकरणामूळे जंगलांची होत असणारी कत्तल लक्षात घेता पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणाऱ्या वनस्पती काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या असल्याची खंत पिठोरी व्रत साजरा करणाऱ्या भाविकांकडून व्यक्त करण्यात आली.

पिठोरी मातेचे पूजन हे मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी करण्यात येते. पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणारी वनस्पती जंगल-डोंगर भागात उगवत आसल्याने अनेक भक्तजन या विधिवत पूजनासाठी लागणाऱ्या वनस्पतीच्या शोधत डोंगर कपड्याची गवसणी घालतात. या वनस्पतीच्या शोधात निघालेले भक्तजन सकाळी भल्या पहाटे घर सोडतात. आणि सायंकाळी पूजेसाठी लागणारी वनस्पती घेऊन घर गाठतात.

पूजेची वनस्पती घेऊन आलेले भक्तजन सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य पिठोरी मातेला दाखवण्यात येतो.

नैवेद्यात वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. आशा विधिवत व्रताच्या पूजनाने घराला सुख-शांतीसह अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्र प्राप्त होतात. असे पौराणिक काळापासून चालत आलेलं भाकीत आसल्याने पिठोरी मातेच्या विधिवत पूजन ठाणे जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीच्या भागात केली जाते.

मात्र शहरीकरणाचा होत असलेला झपाट्याने विकास आणि त्यासाठी मोट्या प्रमाणात होत असलेली जंगलाची कत्तलीमुळे पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणारी वनस्पती शोधण्यासाठी भक्तांची तारेवरची करावी लागत आहे.

जंगल नष्ट झाल्याने या वनस्पतीच्या शोधत भक्तांनी डोंगर कपड्याची गवसणी घालत वनस्पती शोधल्या. त्यातही पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणाऱ्या बहुतांशी वनस्पती ह्या शहरीकरणामुळे काळाच्या ओघात लुप्त होत गेल्याची खंतही भक्तांकडून पुढारीशी बोलतांना दिसली.

मी कल्याण पश्चिम वाडेघर गावातील रहिवाशी आसून माझ्या घरी गेली चाळीस वर्षे भक्तिभावाने पिठोरी मातेची पूजन विधिवत केली जाते. पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणारी वनस्पती गावाशेजारी असणाऱ्या जंगल भागात सहजपणे उपलब्ध होत होती. मात्र गावाचे गावपण संपले आसून गावाशेजारी असणाऱ्या जंगलाचे सिमेंटच्या जंगलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पतींच्या शोधात आम्ही ग्रामस्थ डोंगर कपड्यांमध्ये गवसणी घालावी लागत आहे.
कपिल काशीनाथ निळजेकर पिठोरी मातेचं व्रत करणारा भक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT