Commercial Gas Shortage Pudhari
ठाणे

Petrol Gas Shortage: पेट्रोल-घरगुती गॅस सिलिंडरची अघोषित टंचाई?; ठाणे, रायगडला चटके

इराण-इस्रायल तणावाचा परिणाम; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे / पाली : ठाणे आणि रायगड जिल्ह्यात घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू लागल्याने गृहिणींना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ठाण्यात कळवा, विठावा, मुंब्रा भागात घरगुती गॅसची टंचाई होती. तर कमर्शियल गॅस कमी झाल्याने हॉटेल, व्यवसायावर परिणाम झाला आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता ठाणे, रायगड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि इंधन दर वाढतील, या भीतीने जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात पेट्रोल टंचाई आणि गॅस टंचाई असे दुहेरी संकट आहे. तर, ठाणे जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा आहे. परिणामी हॉटेल व्यवसाय काही ठिकाणी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर ग्रामीणभागात पुन्हा एकदा लाकडाच्या मागणीत वाढ झाली आहे. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्याचे फलक लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी अघोषित टंचाईचे वातावरण तयार झाले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा

आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली आहे. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही पेट्रोल पंपांवरील साठा झपाट्याने संपत असून पुरवठा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अनेक नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांमध्ये दैनंदिन प्रवास कसा करायचा याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास वाहतुकीचा खर्च वाढण्याची आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT