ठाणे : ठाणे संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये पंढरपूर वारी या विषयावर राज्यभरातून छायाचित्र स्पर्धेसाठी मागवण्यात आली होती. हजारो चित्रातून सुधीर नाझरे यांच्या चित्राला प्रथम क्रमांकचा पुरस्कार 2 इतर पूरस्कार आज जाहीर झाला. 11 हजार रोख व सन्मान चिन्ह देऊन 9 फेब्रुवारीला 2026 रोजी ठाणे उपवन आर्ट गॅलरी येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आळंदी व देहू येथून माऊलींची व तुकारामाची पालखी पंढरपूरला पायी वारकरी वारी करतात त्यावेळचे जिवंत अनुभव टिपण्याचे काम सुधीर नाझरे यांनी केले आहे. गेली 15 वर्ष वारीचे छायाचित्रण करत असल्याने वारीतील प्रत्यक्ष क्षणाचे फोटो संग्रही आहेत .
सुधीर नाझरे गेली 22 वर्ष वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून विविध वृत्तपत्रात काम करत आहेत. महाराष्ट्रातील 43 पुरस्कार त्यांना मिळालेत व त्यांचे महाराष्ट्रात 12 ठिकाणी छायाचित्रांचे प्रदर्शन झाले आहे. मागील 3 वर्ष जागतिक स्पर्धेत नाझरे यांनी भाग घेण्यास सुरवात केली. आज त्यांच्या विविध चित्रांना 173 गोल्ड मेडल प्राप्त झालेत. फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिकाचे अनेक गोल्ड मेडल मिळवून महारष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले चित्र जगासमोर नेहमीच्या मांडत आलेत.
गेल्यावर्षी रशियात झालेल्या फोटो ऑलोम्पिक 2025 साठी भारतातून 95 फोटोग्राफरची स्पर्धेतून निवड करण्यात आली. त्यात भारताचे 5 फोटोग्राफर निवडले त्यात महाराष्ट्रातून सुधीर नाझरे होते. उरलेले 4 कलकत्याच्या होते. रशियात फोटो प्रदर्शनात वारीतील 2 फोटो प्रदशित झाले होते .