पालघर (ठाणे) : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि इतर जिल्हा मार्गावरील अपघात प्रवण अपघात प्रवण स्थळांच्या सर्वेक्षणासाठी सुमारे एक कोटी रुपया खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वीस अपघात प्रवण स्थळांच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रुपये तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आले आहेत. साडे पाच लाख रुपये प्रती अपघात प्रवण स्थळ असा दर निश्चित करून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपघात प्रवण स्थळांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांच्या प्रस्थावीत खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे,
पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरील अपघात प्रवण स्थळांचे सर्व्हेक्षण आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजनां बाबत अहवाल सादर करण्यासह कामावर देखरेख करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. सव्र्व्हेक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील वीस अपघात प्रवण स्थळे निश्चित करण्यात आली असुन एका अपघात प्रवण स्थळासाठी साडे पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचे मूल्यमापन, संनियंत्रण व डाटा इंट्री करण्याच्या लेखशीर्षा अंतर्गत एका कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्व्हेक्षणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता क्रमांक दोन यांचे नियंत्रण आणि मार्गदर्शनात सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले आहे.
मुंबईतील टनडोन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला ०४ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. वर्ष भरात ठेकेदार कंपनीने सर्व्हेक्षण करून तयार केलेला अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोपवण्यात आला आहे. टनडोन अर्बन सोलुशन कंपनीला कार्यादेश देण्याआधी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाटा आणि सातिवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असताना दोन्ही ठिकाणांचा समावेश सव्र्व्हेक्षणसाठी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई अहमदाबाद तसेच पालघर सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील अकरा अपघात प्रवण ठिकाणे, राज्य मार्गावरील तीन तर इतर जिल्हा मार्गावरील सहा मिळून एकूण वीस अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग : जव्हार फाटा, हालोली, वाडा खडकोना, सातीवली, वरवाडा, वडवली, इभाड पाडा, आरटीओ चेक पोस्ट, मेंढवन, चारोटी ब्रिज नाका
पालघर- सिन्नर राष्ट्रीय महामार्ग : भोपोली, कासट वाडी
राज्य मार्ग : कुडूस, सापने, माहीम-रेवाळे वळण, कुरगाव-पास्थळ, सफाळे घाट, मान-महागाव-वरांगडे विराज कंपनी परिसर, गुंदले वाघोबा घाट, बिरसा मुंडा चौक, खैरापाडा रेल्वे ब्रिज ते मुथूट नाका-सरावली.