Navratri 2025 Colours with Date in Marathi
ठाणे : आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे. सोमवार, 22 सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव असून गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) आहे, अशी माहिती पंचांगकर्ते खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
नवरात्रातील नवरंगाविषयी सोमण म्हणाले की, आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र उत्सव हा निर्मिती शक्तीचा, आदिशक्तीचा तसेच महिलांच्या सबलीकरणाचा उत्सव असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
1) सोम.22 सप्टें. : सफेद/पांढरा
2) मंगळ.23 सप्टें. : लाल
3) बुध.24 सप्टें. : निळा
4) गुरू.25 सप्टें.: पिवळा
5) शुक्र.26 सप्टें. : हिरवा
6) शनि.27 सप्टें. : करडा/ग्रे
7) रवि. 28 सप्टें. : केशरी/भगवा
8) सोम.29 सप्टें. : मोरपंखी
9) मंगळ.30 सप्टें. : गुलाबी.
10) बुध.1 ऑक्टो. : जांभळा.