नवरात्र www.pudhari.news  file photo
ठाणे

नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे धर्मग्रंथात नाही! दा. कृ. सोमण यांचे मत

अनुराधा कोरवी

ठाणे : नवरात्रौत्सवात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्रौत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रौत्सवात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केले.

याबाबत दै. 'पुढारी'शी बोलताना सोमण म्हणाले, की नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी हा नवरात्रौत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो.

यंदा नवरात्रातील रंग

३ ऑक्टोबर गुरुवार - पिवळा

४ ऑक्टोबर शुक्रवार -हिरवा

५ ऑक्टोबर शनिवार - करडा

६ ऑक्टोबर रविवार - भगवा

७ ऑक्टोबर सोमवार - पांढरा

८ ऑक्टोबर मंगळवार - लाल

९ ऑक्टोबर बुधवार - निळा

१० ऑक्टोबर गुरुवार - गुलाबी

११ ऑक्टोबर शुक्रवार - जांभळा

१२ ऑक्टोबर शनिवार - मोरपिशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT