नागपूर: प्रबुद्ध महिलांच्या वतीने काळे वस्त्र परिधान करुन सरकारचा निषेध

नागपूर: प्रबुद्ध महिलांच्या वतीने काळे वस्त्र परिधान करुन सरकारचा निषेध
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: अंबाझरी परिसरातील डॉ. आंबेडकर भवनासाठी प्रबुद्ध महिलांच्या धरणे आंदोलनाचा आज ४८ वा दिवस होता. शासन, प्रशासन महिलांच्या न्याय मागण्यांबाबत दखल घेत नाही. या निषेधार्थ आंदोलनकर्त्या महिलांनी काळे वस्त्र परिधान करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

देशात आजही महिलांच्या प्रश्नाकडे शासन, प्रशासन लक्ष देत नाही. महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप करण्यात आला. डॉ. बाबासहेबांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास प्राधान्य देऊनही महिला पीडित आहेत. बलात्कार, अत्याचाराचे प्रकार वाढत असताना महिला दिवस साजरा करण्याचे औचित्य काय? असा सवाल आंदोलनात उपस्थितांनी केला.

आंदोलनस्थळी जैबुन्निसा शेख, ओबीसी महासंघाच्या कार्याध्यक्ष प्राचार्य शरयु तायवाडे, नेहा ठोंबरे यांनी भेट दिली. पल्लवी जीवनतारे, केवल जीवनतारे यांचा नाटक प्रयोग सादर करण्यात आले.

सातत्याने आंदोलनस्थळी उपस्थित ज्येष्ठ महिला शांताबाई वानखेडे, विजया नंदेश्वर, सुमन गायकवाड, जयंताबाई काळबांळे, सुमन वानखेडे, पदमा रंगारी, सिंधु नाईक, अंजनाबाई कांबळे, जयवंता मेश्राम यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डॉ. सरोज आगलावे, पुष्पा बौध्द, तक्षशिला वाघघरे, डॉ. सरोज डांगे, सुषमा कळमकर, ज्योती आवळे, उज्ज्वला गणवीर, छाया खोब्रागडे, कल्पना मेश्राम, सरिता सातारडे, जयश्री गणवीर, भारती सहारे, सुगंधा खांडेकर, नलिनी नाईक, रजनी लिंगायत, पुष्पा घोडके, शैला नंदेश्वर, वंदना आटे, रिता नागरे, सुनिता चव्हाण, द्रोपदी रंगारी, सुनिता चव्हाण, पौर्णिमा शेलारे, यमुताई वाळके, शोभा घरडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news