ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा येथे असलेल्या विना पाटीच्या पान शॉपवर मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा त्रिंबकराव जाधवर यांनी पथकासह २४ ऑगस्ट, रोजी कारवाई करून सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित गुटखा असा १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
शिवाय दुकानदार अजय राजू पटेल(२०) याच्या विरोधात मागील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संघटितपणे साथ, पुरवठा आणि विक्री करण्यात येत असल्याने संघटित गुन्हेगारी मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस नौपाडा पोलीसना केली आहे.
दुकान चालविणाऱ्या अजय राजु पटेल, वय 20 वर्षे, याला ताब्यात घेऊन दुकानाची तपासणी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी सुजाता मुंढकर तसेच स्वंतत्र पंच साक्षीदार यांच्या समवेत तपासणीत सुगंधी तंबाखू, प्रतिबंधित गुटखा, असा १३ हजार १०७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पथकाने नौपाडा पोलीस ठाण्यात दुकान चालक अजय राजु पटेल याच्या विरोधात विक्रेता पुरवठादार, पंचनाम्यात नमुद उत्पादक व इतर सर्व संबधित यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीसाठी साठवणुक केल्याने व अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलम 26 (2) (1), 26(2) (iv), 27(3) (D), सह्वाचन शिक्षा कलम 59 तसेच कलम 30(2) (A) व मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना गुन्हा दाखल केला. नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस
नौपाडा पान शॉप कारवाईबाबत उत्पादक,साठेबाज, वितरक आणि विक्री करणारे अशा संघटितपणे सदरचे प्रकरण असून ऍन सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी तयार केलेल्या पंचनाम्यात उत्पादक, व इतर सर्व संबंधितांचा सहभाग शोधून साखळीदवारे संघटीत गुन्हेगारी तसेच अवैध मार्गाने आर्थीक लाभ मिळवला जात असल्याचे आढळून येत असल्यास तसेच संबंधितांच्या विरोधात मागील 10 वर्षा पुर्वीचे गुन्हे, दोषारोपपत्रे व त्यावरील दखल याची पडताळणी करावी व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम 1999 (मकोका) अंतर्गत आवश्यक त्या कलमाअंतर्गत विहीत प्रक्रियेचे पालन करून सदर कायदयाअंतर्गत सुदधा कारवाई घेण्यात यावी. याबाबत अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दि. 12/06/2026 रोजी निर्गमित केलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडुन नौपाडा पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे.