Naresh Mhaske criticism Uddhav Thackeray
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात जय गुजरात, अशी घोषणा दिल्याने विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मराठी मते मिळावी, यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करीत आहे. ठाकरे हे दुतोंडी सापासारखे आहेत, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका गुजराती कार्यक्रमात भाषण देताना प्रथम जय महाराष्ट्र, त्यानंतर जय गुजरात अशी घोषणा दिली. आपण ज्या प्रदेशात अथवा समाजाचा कार्यक्रम असतो. तेव्हा जय महाराष्ट्र नंतर जय कोकण, जय राजस्थान, जय विदर्भ असे बोलत असतो, अशी उदाहरणे देत शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेचे समर्थन केले. हे समर्थन करताना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची आणि भूमिकांची कुंडलीच मांडली.
केवळ मतांसाठी गुजराती माणसे आणि भाषेचे उदोउदो केले. तेव्हा जय गुजरातचा नारा देणाऱ्या ठाकरे यांना मराठी प्रेम नव्हते काय? त्यावेळी गुजराती विरोध मावळा होता काय ? संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत मांडीला लावून बसत आहात. लोकसभा निवडणुकीसाठी पाकिस्तानातून फतवे निघाले, तेव्हा ठाकरे यांचे देशप्रेम कुठे गेले होते ? जितेंद्र आव्हाड यांना कुठलीच नैतिकता नाही. जय पॅलेस्टाईनची घोषणा, अतिरेकी इशरत जहाँ, अर्बन नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर टीका करण्याची नैतिकता नाही. केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मते घेण्यासाठी ठाकरे, आव्हाड हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करीत असून ते दुतोंडी असल्याचे म्हटले आहे.