Vande Bharat Express Pudhari File Photo
ठाणे

Nagpur Pune Sleeper Vande Bharat Express: मुंबई-बंगळुरूनंतर नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; प्रवाशांमध्‍ये उत्सुकता

१६ डब्यांसह फर्स्ट क्लास एसी सुविधा

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: महाराष्ट्रात नागपूर ते पुणे या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित ट्रेनमध्ये १६ डबे, थ्री-टीअर एसी, टू-टीअर एसी आणि फर्स्ट क्लास एसी सुविधा असण्याचा अंदाज आहे.

मुंबई ते बंगळुरू या दोन शहरादरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा नागपूर ते पुणे या मार्गावरही स्लीपर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे विदर्भ, प. महाराष्ट्रातील प्रवाशांमधून मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

नागपूर हे विदर्भातील प्रमुख शहर आहे, तर पुणे हे शिक्षण, आयटी, उद्योग आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहे. या दोन्ही शहरांदरम्यान विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांची नेहमीच तुडुंब गर्दी असते.

सध्या या मार्गावर चेअरकार प्रकारातील वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. पण या प्रवासाला १२ तास लागतात, त्यामुळे खुर्चीवर बसून प्रवास करणे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची कुटुंबे आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असे. त्यामुळे या मार्गावर स्वतंत्र 'स्लीपर वंदे भारत' सुरू करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे मार्गावर प्रस्तावित असलेल्या या स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असण्याची शक्यता आहे. यामध्ये थ्री-टीआर एसी, टू-टीआर एसी आणि फर्स्ट क्लास एसी अशा तीन श्रेणींचा समावेश असू शकतो.

तसेच आधुनिक आसन व्यवस्था, आरामदायक शयनयान सुविधा आणि ताशी १६० किमी पर्यंतचा वेग यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल.

पुण्याला जाणे होणार सोपे...

सध्याच्या वंदे भारत ट्रेनचे अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड यांसारख्या स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे प्रस्तावित स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना पुण्याला जाणे अधिक सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT