Murbad Road Fund Pudhari
ठाणे

Murbad Road Fund: एकाच रस्त्यावर चारवेळा कोट्यवधींचा खर्च; मुरबाडमधील थिदबी रस्त्यावर संशयाची छाया

मागील वर्षी तयार रस्ता पुन्हा उखडला; प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून नव्याने 2 कोटींचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या थिदबी गावाला एकाच रस्त्यावर शासनाने वेगवेगळया विभागातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याच रस्त्यावर आता दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा घाट प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुरु केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग 61 वर सावर्णे हे गाव आहे. या राष्ट्रीय महामार्गापासून थिदबी साधारणत: दोन ते अडीच किलोमीटरच्या आसपास आहे. सातत्याने पर्याटकांची वर्दळ या रस्त्यातुन सुरु असते. त्यामुळे मागील वर्षीच मुरबाडच्या सार्वजानिक बांधकाम विभागातून सावर्णे पासून ते थिदबी गावापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी जवळ जवळ या रस्त्यावर एक कोटीच्या आसपास निधी र्च केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मागील दोन वर्षापूर्वी देखिल याच रस्त्यावर सिमेंट क्राँक्रीटीकरण रस्त्यासाठी जि.प.बांधकाम विभागाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी सुध्दा खर्च करण्यात आला होता. मात्र एकाच रस्त्यावर तीन वेळा सतत निधी खर्च झाला असतांना देखिल यावर्षी पुन्हा दोन कोटी रुपये निधी खर्च करण्याचा घाट प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या केला जात आहे.

मागील वर्षीच बनवलेल्या रस्त्याला साई सिध्दीनाथ या एजेंन्सीने जेसीबीच्या सहायाने बनविण्यात आलेल्या सिमेंन्ट क्राँक्रीटी करणाचा रस्ता फेकुन दिला असल्याची बाब समोर आली आहे. शिवाय नव्याने बनवण्यात आलेल्या डांबरीकरण देखिल उखडले आहे. सदर रस्ता अत्यंत कमी कालावधीत पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली उखडण्यात येत असून, यामागील कारणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मागील वर्षीच आम्ही हा डांबरी करणाचा रस्ता बनविला होता. सदरचा रस्ता हा जि.प.बांधकाम विभागाच्या अधिपत्या खाली येत आहे. त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही प्रकाराची खोदकामास परवानगी घेतली नाही.
संजय कोरडे, उपअभियंता सा,बा.उपविभाग मुरबाड

सार्वजनिक निधीचा अपव्यय

स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते का, किंवा नियोजनातील त्रुटींमुळे हा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका काही सुज्ञनागरिकां कडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावर जर एकाच कामासाठी तीन ते चार वेळा निधी खर्च केला जात असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी केला जात आहे.

या रस्त्याबाबत मला कोणतीच कल्पना नसून मी जेईंना विचारुन सांगतो.
व्हि.एस.जडे, उपअभियंता.जि.प. बांधकाम विभाग मुरबाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT