SGNP Leopard Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बिट्टू’ बिबट्याचा मृत्यू; दीर्घ आजाराशी झुंज अपयशी

येऊरमधून वाचवलेल्या 6 वर्षीय बिबट्याचा अंत; मूत्रपिंड विकारामुळे प्रकृती खालावली
Maval Leopard
Maval LeopardPudhari
Published on
Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे 6 वर्षांचा नर बिबट्या बिट्टू याचा 21 मार्च 2026 रोजी दीर्घकालीन आजारामुळे मृत्यू झाला. या बिबट्याला परिवहन मंत्री यांनी दत्तक घेतले हेोते. बिट्टू 4 डिसेंबर 2019 रोजी ठाणे वनविभागातील येऊर परिसरातून काही दिवसांचा असताना वाचवण्यात आलेला बछडा होता. त्याचे संगोपन व देखभाल उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.

Maval Leopard
Mumbai Illegal Bike Taxi: मुंबईत बेकायदा बाईक टॅक्सी सुरूच; बंदीच्या आदेशांनंतरही प्रशासन निष्क्रिय?

काही महिन्यांपासून त्याच्यात आजाराची लक्षणे दिसून येत होती आणि त्याच्यावरील लक्षणांनुसार उपचार करण्यात येत होते. सर्वतोपरी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत गेला. त्यानंतर त्याच्यात अंतर्गत गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आणि दिनांक 21 मार्च 2026 रोजी त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय पथकाद्वारे करण्यात आलेल्या सविस्तर शवविच्छेदनात मूत्रपिंडांमध्ये सिस्ट्स आढळून आल्या असून,

Maval Leopard
Goregaon Fire Incident: गोरेगावातील गोकुळधाममध्ये भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू

प्राथमिक स्थूल विकृतिशास्त्रीय तपासणीत मूत्रपिंड विकारामुळे बाकीचे अवयव निकामी होण्याची शक्यता दर्शविण्यात आली होती. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असून जैविक नमुने पुढील हिस्टोपॅथॉलॉजिकल व पुष्टीकरणात्मक तपासणीसाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान विभागाकडून देण्यात आली.

Maval Leopard
National Commission for Women: राष्ट्रीय महिला आयोग 500 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला; भाजपशासित चार राज्यांत मात्र राज्य आयोगाचे गठन नाही

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पिंजऱ्यांमध्ये एकूण 24 बिंबटे होते. यापैकी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने आता 23 बिबटे पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त आहेत. यापैकी 8 नर, तर 15 माद्या आहेत. तसेच नैसर्गिक अधिवासात 50 च्यावर बिबटे मुक्त संचार करत आहेत.

डॉ. विनया जंगले, पशुवैद्यकीय अधिकारी, नॅशनल पार्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news