Crime pudhari photo
ठाणे

Thane Liquor Smuggling : रेतीबंदर परिसरात अवैध मद्यसाठा जप्त; एकाला अटक

एक कोटी ५४ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंब्रा येथील पारसीक रेतीबंदर परिसरात सापळा रचून गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची तब्बल १,२३५ बॉक्स असा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्याच्या ५९ हजार २८० बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रक असा एकूण एक कोटी ५४ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

परराज्यातून महाराष्ट्रात अवैध रित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यां विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी अभिषेक जगताप (वय २५, रा. मुळशी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला २५ नोव्हेंबर रोजी जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पारसीक रेतीबंदर, मुंब्रा परिसरातून गोवा राज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने परिसरात सापळा रचला. यावेळी एक ट्रक संशयावरून अडविण्‍यात आला. ट्रक चालकाकडे चौकशी केली असता, त्याने ट्रकमध्ये पंखे व त्यांचे सुटे भाग असल्याचे सांगितले. मात्र, पथकाने वाहनाची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात बॉक्स आढळून आले.

१८० मिली क्षमतेच्या मद्याच्या बाटल्या

ट्रकमधील बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. बाटल्यांवर बॅच क्र. व कमाल किरकोळ विक्री किंमत नव्हती. तपासणीत महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या ब्रँडच्या १,२३५ बॉक्स मध्ये ५९ हजार २८० बाटल्या असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ट्रकचालक अभिषेक जगताप याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT