ठाणे : मुंब्रा येथे राहणाऱ्या एक कुटुंबात पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, या संशयावरून पतीनेच पत्नीच्या प्रियकराच्या धारधार शस्त्राने गळा कापून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कौसा मुंब्रा येथे भारत गेयर जवळ आपले पती राजू यादव, वय 39 वर्षे यांचा सहारा सिटी येथे बांधकामाच्या ठिकाणी गळा कापून खून झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक रहिवाशांकडे सखोल चौकशी केली असता, या गुन्ह्याचा उलगडा झाला. हा खून अबिद मलिक याने राजू यादव याचे त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून केल्याचे पुढे आले. येथील रिक्षाचालक यांनाही याबाबत माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर रिक्षाचालकाला अबिद याने भाई राजू गलत काम कर रहे है,
एक दिन मै उसका बदला लुंगा असे सांगितले होते. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीनेही आपले पती व आपण मिळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राजू यादव याला पेप्सीमधून सोडियम नायट्रेट दिले. त्यानंतर तो नशेत गेला. त्यानंतर दांड्याने मारहाण केली आणि धारधार शस्त्राने गळा कापल्याची कबुली दिली. यानंतर अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास लावण्यात आला.