चालत्या स्कूल बसने घेतला पेट pudhari photo
ठाणे

School bus fire accident : चालत्या स्कूल बसने घेतला पेट

विद्यार्थ्यांना सोडून आल्यावर प्रकार घडल्याने मोठी जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंब्रा-कौसा येथील सिम्बॉयसिस शाळेच्या बसने अचानक पेट घेतल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा बायपास मार्गावर असताना घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना सोडून आल्यावर हा सर्व प्रकार घडल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंब्रा कौसा येथील सिम्बॉयसिस शाळेची बस विद्यार्थ्याना सोडुन परतीच्या मार्गावर असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने बसला आग लागली. आग लागताच चालक आणि क्लिनर (मदतनीस) सुदैवाने बसच्या बाहेर पडल्याने बचावले आहेत. बसमधील विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले आणि काही अंतरावर जाताच स्कूल बस पेटली. कौसा येथील सिंबोसिस शाळेतील जवळपास 35 ते 40 विध्यार्थीना शाळेच्या बसमधून घरी सोडण्यात आले. त्यानंतर रिकामी बस ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा देवी जवळ आली असता दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला.

बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याची माहिती कळताच ड्रायव्हर दत्तात्रय पाटील व कंडक्टरने बस बाजूला लावली आणि तत्काळ बस बाहेर पडले. बघता बघता स्कूल बसचा जोरदार भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दलाचे अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनसह 2 रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते व गाडीला आग लागताच गाडी चालक व गाडी क्लिनर सुरक्षेच्या कारणास्तव गाडी बाहेर आले होते अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती अधिकाऱ्यांनी दिली.

बस पूर्णपणे जळून खाक झाली

सिंबोसिस शाळेच्या बसला आग लागली असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी रुपेश शेळके यांनी अग्निशमन पथकाला दिली. त्यानुसार मुंब्रा अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या 12 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली. दरम्यान, अवघ्या अर्ध्या तासातच बसचा कोळसा झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

मुंब्रा बायपासवर वाहतूककोंडी

भर रस्त्यात बसने पेट घेतल्याने दोन्ही मार्गावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी वाहतुक शाखेचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT