assault case pudhari photo
ठाणे

Thane Crime : भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : व्हिडिओ काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात ओढून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भाईंदर पश्चिम येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी निखील घाडगे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी सुभाष मैदान येथे गेली होती. त्यावेळी आरोपी निखील घाडगे याने त्यांचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला.

याबाबत पीडितेने त्याला जाब विचारला असता तो घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास पीडित मुलगी निखीलच्या घरी व्हिडिओबाबत विचारणा करण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने घरामध्ये ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

या घटनेनंतर मंगळवारी पीडितेच्या नातेवाइकांनी भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर भाईंदर पोलिसांनी तत्काळ आरोपी निखील घाडगे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT