Municipal Employee Dance Pudhari
ठाणे

Municipal Employee Dance: आमदारांच्या वाढदिवसात पालिका कर्मचाऱ्याचा ‘डान्स’!

पाणीटंचाईच्या काळात राजकीय कार्यक्रमातील सहभागावरून वाद; निलंबनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी संजय सोनावणे हे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ढोल-ताशांच्या तालावर नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे.

या प्रकाराची चौकशी करून सोनावणे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते जय ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.

मिरा-भाईंदर शहरातील अनेक भागांत नागरिकांना ३६ ते ४८ तासांच्या अंतराने पाणी मिळत असल्याचा दावा जय ठाकूर यांनी केला.

नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून महापालिका सेवा आचारसंहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पालिका कर्मचारी हा सार्वजनिक सेवेत कार्यरत असल्याने राजकीय कार्यक्रमातील त्यांचा सहभाग नियमांच्या चौकटीत तपासला जावा, अशी मागणी पुढे आली आहे. आता आयुक्त राधाबिनोद शर्मा या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT