Pratap Sirnaik
ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी 4 ते 5 किलोमीटर ऑटोरिक्षा चालवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सरनाईक यांच्या ठाण्यातील कार्यालयात राहुल साळुंके यांनी सरनाईक यांच्या गाडीची नंबर प्लेट असणारी ऑटो रिक्षा आणली होती, ती पाहून सरनाईक यांच्या रिक्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. सरनाईक यांनी स्वतः रिक्षाची किक मारत रिक्षा चालक आणि त्याच्या मुलाला पाठीमागे बसण्यास सांगितले. आणि त्यांनी आपल्या कार्यालयापासून तब्बल चार ते पाच किलोमीटर रिक्षा चालवली.