मुरबाड (ठाणे) : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता वनविभागाच्या संरक्षित अभयारण्यातून जात असल्याने वनविभागाची परवानगीने रस्त्याच्या कडेला असलेली वनौषधी वनस्पतीसह पुरातन झाडे तोडण्यात येऊन रस्त्याचे काम दिवसरात्र सुरु आहे. परंतू रस्त्यात येणारे दगड फोडण्यासाठी वनविभागाने भू सुरुंग स्फोट करण्यास परवानगी दिलेली नसतांना देखील ठेकेदाराकडून भू सुरुंग स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटामुळे सह्याद्री पर्वत रांगेत येणार्या माळशेज घाटाला हादरे बसून भविष्यात भुसखलनचा धोका आहे.
शिवाय या परिसरात असलेले वन्यप्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आलेले असून ते आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र सैराभर पळत असून दोन दिवसांपूर्वी हरणांचा एक कळप झाडघर हद्दीतून भयभीत अवस्थेत धावतांना दिसला तर, काल दिनांक 23 रोजी एक वानर या महामार्गाच्या बाजूला जखमी अवस्थेत आढळून आल्याचे अरुण राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वनविभागाला या बाबत माहिती दिली.
विकास झाला पाहीजे मग ते रस्ता असोत किंवा धरणं, परंतू नैसर्गिक संपत्ती, पशु-पक्षी यांचा विनाश करुन नको. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण होणे ही काळाची गरज होती. ती पूर्ण करण्याचे काम आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास जात आहे. हा महामार्ग वैशाखरे ते माळशेजघाट असा 30 किमीचा भाग भिमाशंकर अभयारण्यातून जात आहे. हे अभयारण्य म्हणजे नुसती वनसंपदाचे नव्हे तर अनेक प्रकारचे प्राणीपक्षी यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण असल्याने व वन कर्मचार्यांचा जागता पाहरा असल्याने वन्य प्राण्यांची शिकार अथवा गावठी कट्ट्यांचा आवाज होत नसल्याने या परिसरात मोर, ससे कोल्हे, लांडगे, वानर यासह बिबट्यांचा मुक्त संचार असतो. परंतू या महामार्गाचे काम सुरु झाल्या पासून ठेकेदाराकडून रस्त्याची खोदाई करतांना मोठ्याप्रमाणात भू सुरुंग स्फोट घडवले जात आहेत. यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तक्रार वन्यप्रेमी नागरिक अरुण राऊत यांनी, टोकावडे वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाला देऊन देखील ठेकेदाराची ठो-ठो सुरुच आहे.
या स्फोटकांचा आवाज ऐकून काल एक हरणांचा कळप झाडघर परिसरात भयभीत होऊन पळतांना अरुण राऊत यांनी पाहीला . तसेच ते जून्नर येथून टोकावडे येथे घरी येत असतांना एक वानर त्यांना जखमी अवस्थेत हे स्फोट घडवले जात असल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर दिसला. याची माहीती त्यांनी टोकावडे वनविभागाच्या कार्यालयात जाऊन देण्याचा प्रयत्न केला परंतू साप्ताहिक सुट्टी असल्याने त्यांना ती माहिती देता आली नाही. या वानरावर माळशेज घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून औषधोपचार करण्यात आले. माळशेज घाट अनेकदा पावसाळ्यरात कोसळतो. असे असतांना हे स्फोट आणखी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे भूसुरंगस्फोट करण्याऐवजी ठेकेदाराने पोकलेनच्या सहाय्याने त्याची खोदाई केल्यास वन्यप्राणी सुरक्षित राहतील आणी घाटाला धोका पोहोचणार नाही. अशी मागणी अरुण राऊत यांनी केली आहे.