Malanggad Yatra Tradition: रंगीबेरंगी काठी : श्री मलंगगड यात्रेची शतकानुशतके जपलेली ओळख Pudhari
ठाणे

Malanggad Yatra Tradition: रंगीबेरंगी काठी : श्री मलंगगड यात्रेची शतकानुशतके जपलेली ओळख

आधुनिक रोपवेच्या युगातही भाविकांच्या हातात कायम श्रद्धेची काठी; मलंगगड दर्शनाशी घट्ट नातं

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : शुभम साळुंके

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड यात्रेचे एक आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे भाविकांच्या हातातील रंगीबेरंगी काठी. ही काठी केवळ श्री मलंगगड यात्रेतच पाहायला मिळते आणि तिची ओळख मलंगगड दर्शनाशी घट्ट जोडलेली आहे. आधुनिक सुविधा वाढल्या असल्या, तरी ही पारंपरिक काठी आजही यात्रेची ओळख कायम ठेवून आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक हि काठी पायी जाताना विकत घेताना दिसून येत असून वर्षनुवर्षाच्या ओळखीची काठी भाविकांच्या हातात कायम राहिली आहे.

दरवर्षी माघ पौर्णिमेच्या यात्रेत गडाच्या पायथ्यापासून गडावर पायी चढताना भाविक आवर्जून या काठ्या विकत घेतात. अवघ्या वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत दर असलेल्या या काठ्या भाविकांसाठी आधारासोबतच श्रद्धेचे प्रतीक मानल्या जातात. यंदा फ्युनिक्युलर सेवा सुरू झाल्यामुळे भाविकांचा मोठा भाग गडावर पायी चढण्याऐवजी रोपवेने प्रवास करत असला, तरी श्री मलंगगड काठीची परंपरा मात्र अबाधित राहिली आहे.

डोंगराळ भागात विशेषतः भेंडीच्या वृक्षाच्या फांद्या पासून तसेच इतर स्थानिक वृक्षांच्या फांद्यांपासून या काठ्या तयार केल्या जातात. स्थानिक कारागीर या काठ्यांवर पिवळा, हिरवा, लाल, गुलाबी अशा आकर्षक रंगांची रेखाटने करतात. या रंगसंगती मुळे काठ्या दूरवरूनच लक्ष वेधून घेतात. यात्रेदरम्यान गडाच्या पायथ्याशी या काठ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येते. अनेक भाविक गडावर पोहोचल्यानंतरही ही काठी सोबत ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT