मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन pudhari photo
ठाणे

Maratha Reservation Cell : मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन

मराठा समाजाच्या सवलतींबाबतही कार्यवाही होणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रभावी सनियंत्रण, मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचे समन्वय मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामकाजाचे व्यवस्थापन आणि अनुषंगिक कामकाजासाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागामध्ये स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी पाच अधिकारी आणि कर्मचारी मंजूर करण्यात आले आहे.

मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने विविध योजना घोषित केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने २२ ऑगस्ट २०२५ मध्ये मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठन करण्यात आले. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात आज परिपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये अवर सचिव दर्जाचा अधिकारी, कक्ष अधिकारी, विधी अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर असे पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त होणार आहेत.

मराठा आरक्षण कक्षाद्वारे कॅबिनेट उपसमितीच्या बैठकांचे आयोजन करणे, आंदोलकांच्या मागण्यांवर कार्यवाही, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे आणि 'सारथी' व 'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या योजनांचे विश्लेषण करणे यांसारखे प्रशासकीय कामकाज पार पाडले जाईल. हा कक्ष इतर विभागांशी समन्वय साधून सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करेल.

आरक्षणाशी संबंधित धोरणात्मक निर्णयांसाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आयोजित करणे आणि बैठकीपूर्वी लागणारी अद्ययावत माहिती पुरवणे. मराठा आंदोलकांनी दिलेल्या निवेदने व मागण्यांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करणे, आरक्षणाबाबतच्या सर्व न्यायालयीन खटल्यांची तयारी व समन्वय साधणे. सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचे संकलन व विश्लेषण करणे, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, वसतिगृह, परदेशी शिष्यवृत्ती, विवाह भत्ता आणि इतर लाभांची माहिती एकत्र करणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अधिनियमांतर्गत नियुक्त उमेदवारांची माहिती गोळा करणे.

तसेच, अधिसंख्य पदांवरील उमेदवारांच्या मागण्यांवर प्रशासकीय कार्यवाही करणे. कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांच्या शोधासाठी काम करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कामकाजाशी समन्वय राखणे. आदी कामे या कशाद्वारे केली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT