Mafatlal Land Auction pudhari photo
ठाणे

Mumbai News : कळव्यातील मफतलाल कंपनीच्या जागेचा होणार चौथा लिलाव

कंपनीच्या जमिनीचे DRTमार्फत नव्याने व्हॅल्युएशन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जमिनीची विक्री होत नसल्यामुळे कामगारांची देणी मिळण्यास विलंब होत आहे. कंपनीच्या जमिनीचा डीआरटीमार्फत नव्याने व्हॅल्युएशन रिपोर्ट सादर झाला असून कंपनीच्या मालमत्तेचा चौथ्यांदा लिलाव होण्याची शक्यता आहे. ही लिलाव प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कामगारांची थकीत देणी व भविष्य निर्वाह निधी मिळवून देण्याचे मार्ग मोकळे होतील, अशी ग्वाही बंबई मजदूर युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी आज मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजच्या कामगारांच्या ठाण्यात झालेल्या बैठकीत दिली.

मे १९८९ ते सप्टेंबर १९९९ पर्यंत म्हणजेच कंपनी बंद झाल्यापासून ते कंपनी अवसायानात (लिक्विडेशन) जाई पर्यंत कामगारांना पीएफ मिळण्यासाठी बंबई मजदूर युनियनने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता व न्यायालयाने ही मागणी मान्य करून पीएफ कामिशनरकडे तो वर्ग केला व त्यांनी त्या बाबत ऑर्डर केली आणि त्यामुळे कामगारांच्या पीएफ देण्यामध्ये वाढ झाली. पीएफसाठी देखील बंबई मजदूर युनियन सातत्याने प्रयत्न करत असून उच्च न्यायालयात व पीएफच्या केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत असल्याचेही वढावकर यांनी सांगितले.

गेली ३० ते ३५ वर्ष बंबई मजदूर युनियन ही मान्यताप्राप्त संघटना, मफतलाल कंपनीच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी हायकोर्ट, डीआरटी, पीएफ, लीक्विडेटर, व शासन दरबारी लढा देत आहे मध्यंतरीच्या काळात कामगारंची कायदेशीर देण्याचे नवीन अँडज्युडीकेशन करून रक्कम वाढवण्यात व १५% रक्कम कामगारांना मिळवून देण्यात युनियनला यश आले. या पूर्वी दोन वेळा हायकोर्टामध्ये व एक वेळा डीआरटी मध्ये लिलाव काढण्यात आला होता. मात्र, जमीन खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आता सदर जमिनीचा चौथ्यांदा लिलाव करण्यात येणार आहे.

या वेळी जमीन खरेदी करण्यासाठी एखादा बांधकाम व्यावसायिक पुढे आल्यास, संबंधित कामगारांना त्यांची कायदेशीर देणी व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मफतलाल इंजिनिअरिंगची कळवा येथील जमीन शासनाने ताब्यात घेऊन त्यातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून कामगारांची देणी अदा करता येतील का, हा महत्त्वाचा पर्याय बैठकीत चर्चेला आला.

या संदर्भात युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांना भेटून या बाबत राज्य शासानातर्फे जमीन घेण्याचा प्रस्ताव करून कामगारंची देणी प्रथम मिळवून ध्यावी अशी विनंती केली आहे, अशी माहिती मफतलाल कामगारांतर्फे एम.आर.कुळकर्णी यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT