Las Kalyanachi  Pudhari
ठाणे

Las Kalyanachi Vaccination Awareness: 'लस कल्याणाची' उपक्रमाला कल्याण पश्चिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद

Pudhari ZMQ NGO Initiative: समुदाय नेतृत्वातून लसीकरण जनजागृतीला बळ

पुढारी वृत्तसेवा

Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO Initiative

सापाड : योगेश गोडे

नियमित लसीकरणाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आणि समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‌‘लस कल्याणाची‌’ समुदाय-आधारित लसीकरण उपक्रमांतर्गत, झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम परिसरात रहिवाशांच्या भेटीगाठी आणि लसीकरणाविषय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.

स्थानिक पातळीवर ओपिनियन लीडर्स कोल्स यांच्याकडून लसीकरणाविषयी जनजागृती करणे आणि लसीकरणाशिवाय कोणताही बाळ वंचित राहू नये. त्यामुळे कोल्स अधिक सक्षमपणे लसीकरणाचे जनजागृती करतील. या लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करून अफवा खोडून काढण्यास आणि कुटुंबांना वेळेवर लसीकरणासाठी मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. या चर्चासत्रात प्रमाणपत्र सन्मान समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते.

झेड.एम.क्यू. एनजीओचे प्रतिनिधी हिल्मी कुरेशी यांच्या हस्ते समुदाय लसीकरणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चॅम्पियन संगीता माधे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी गट उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली असून, संगीता माधे यांच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर झेड.एम.क्यू. एनजीओ पथकाने रूपाली जुगनाकर यांच्याशी संवाद साधत गट उपक्रम, समुदाय सहभाग आणि क्षेत्रस्तरीय अनुभवांवर सखोल चर्चा केली. कोल्सकडून मिळालेला अभिप्राय सकारात्मक असून समुदायाकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

las kalyanachi pudhari zmq ngo initiative

या क्षेत्रभेटीदरम्यान रेटीबंदर आणि गुलशन नगर या दोन ठिकाणी समुदाय गट सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 60 नागरिकांनी सहभाग नोंदवला. दोन्ही सत्रांमध्ये लसीकरणाचे महत्त्व, लसीकरणा बाबतचे मिथक विरुद्ध वास्तव, समुदायाची जबाबदारी आणि वेळेवर लसीकरण यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रेती बंदर येथील सत्राचे आयोजन स्थानिक कोल्स फिरोज अहमद यांनी केले. त्यांनी 35 सहभागी नागरिकांना एकत्र आणत ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमाची माहिती दिली, त्याचबरोबर कोल्स नेटवर्कची भूमिका स्पष्ट केली आणि स्वतःच्या परिसरातील अनुभव कथन केले.

या जनजागृतीमुळे पूर्वी लसीकरणास नकार देणाऱ्या एका कुटुंबाच्या लसीकरणाचा चुकीचा गुंता दूर झाला. चर्चेदरम्यान त्यांच्या शंका दूर झाल्यानंतर या कुटुंबाने त्याच दिवशी आपल्या मुलाचे लसीकरण करून घेतले, ज्यामुळे उपक्रमाचा तत्काळ सकारात्मक प्रभाव दिसून आला. दुसरे सत्र गुलशन नगर येथे पार पडले असून, नव्याने जोडलेल्या कोल्स सैरा खाला यांनी या सत्राचे नेतृत्व केले. त्यांनी 25 रहिवाशांना सहभागी करून उपक्रमाची ओळख करून देत पालकांना आपल्या मुलांचे वेळेवर लसीकरण करण्याचे आवाहन केले. या दोन्ही सत्रांमध्ये झेड.एम.क्यू. एनजीओच्या क्षेत्रीय पथकातील रहीम, ज्योती, नगमा व शोभा यांनी मिथक विरुद्ध वास्तव चर्चा, प्रश्नोत्तर सत्रे आणि संवादात्मक उपक्रम राबवत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला.

अनेक सहभागी नागरिकांनी आपल्या शंका मांडल्या, तर काहींना पुढील माहितीसाठी व्हॉट्सॲप चॅनेलवर जोडण्यात आले, ज्यामुळे त्यांना अधिकृत व विश्वसनीय लसीकरण माहिती सातत्याने मिळणार आहे. या उपक्रमाला अंसारी चौक येथील एएनएम रंजना सिस्टर आणि स्थानिक आशा सेविका यांचेही सहकार्य लाभले. एएनएम रंजना सिस्टर यांनी झेड.एम.क्यू. एनजीओ पथक व फिरोज अहमद यांच्या सहकार्याचे कौतुक करत, याच समन्वयामुळे नकार देणाऱ्या कुटुंबाने लसीकरणास संमती दिल्याचे नमूद केले. सत्राच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांनी एकत्र येत लसीकरणाचा संदेश देणारा नारा दिला.

“पाच साल, सात बार - छुटे ना टीका एक भी बार!”

उपस्थित नागरिकांचे प्रोत्साहन वाढावे म्हणून झेड.एम.क्यू. एनजीओच्या वतीने सर्व सहभागींसाठी लहान भेटवस्तूही वितरित करण्यात आल्या. या क्षेत्रभेटी व गट चर्चांमधून समुदाय नेतृत्व, नेटवर्कची प्रभावी भूमिका, डिजिटल माध्यमांचा वापर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय या सर्व घटकांमुळे नियमित लसीकरण बळकट करण्यासाठी समुदाय-आधारित उपक्रम किती परिणामकारक ठरू शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमामुळे कल्याण तालुक्यात लसीकरण कव्हरेज वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT