Railway File Photo
ठाणे

Konkan Kanya Express Delay : मांडवी एक्स्प्रेस तब्बल तीन दिवस लेट

कोकणकन्या एक्स्प्रेसही रखडली; प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : कोकण रेल्वे मार्गावर अनेक एक्सप्रेस गाड्यांना गेले काही दिवस विंलब होत आहे. त्यात मांडवी एक्सप्रेस सलग तीन दिवस लेट आल्याने कोकणकन्या एक्सप्रेसवर देखील याचा परिणाम झाला.

कोकण रेल्वे मार्गावर काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून कोकण रेल्वे मार्गावरची महत्त्वाची असलेली मांडवी एक्स्प्रेस ही तब्बल पाच तासाने बुधवारी उशिरा धावत होती. मांडवी एक्सप्रेसला गेले काही दिवस रोजच लेटमार्क मिळत आहे. याचा फटका पाठोपाठ सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसलाही बसला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही.

मुंबईतून स. ७:१० वा. सुटणारी मांडवी एक्स्प्रेस बुधवारी तब्बल पाच तास उशिरा सुटली. ती दुपारी १२.१५ वाजता सुटणार असल्याचे रेल्वे कळविण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर सुटणारी १०१०३ या क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस रोजच उशिराने सुटत आहे. १ नोव्हेंबरची गाडी सकाळी ७.१०ऐवजी ९ वाजता सुटली होती.

मांडवी पाठोपाठ कोकणकन्या एक्स्प्रेसलाही विलंबाचा फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील या दोन्ही एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीचा सुपरफास्ट एक्सप्रेस असलेला दर्जा रद्द करण्यात आला असून त्या साध्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.

'वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस'

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटक प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आलिशान व सगळ्यांनीच पसंती दिलेली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेली प्रतिष्ठेची असलेली 'वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस' या गाडीला ही आता दुप्पट डबे मिळणार आहेत. या आधी आठ डब्यांची असलेली एक्स्प्रेस तब्बल १६ डब्यांची करण्यात आली आहे.

आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यता

हा बदल इथे १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. डबे वाढवण्यात आल्याने प्रवासी पर्यटकांना या दिवाळीच्या सुट्टीत याचा लाभ मिळणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आरक्षण नेहमीच हाउसफुल्ल असते मात्र आता डबे वाढल्याने स्वाभाविकपणे आसन क्रमांक वाढले आहेत. त्यामुळे वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठीचे आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT