Komasap Awards Pudhari
ठाणे

Komasap Awards: कोमसापचे वाड्‍मयीन पुरस्कार जाहीर; कवी प्रवीण दवणे, बाळ कांदळकर, प्रवीण सोनावणे ठरले यंदाचे मानकरी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा; बाळ कांदळकर, प्रवीण सोनावणे यांच्यासह विविध साहित्यिकांचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे २०२४-२५ या वर्षांचे वाड्‍.मयीन व वाड्‍.मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे प्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रवीण दवणे तर गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर तर कोमसाप युवा पुरस्कार प्रवीण सोनावणे यांना जाहीर झाला आहे.

इतर साहित्यिक पुरस्‍कार

कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार विवेक गोविलकर यांच्या सिंफनी तर द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार उदय जोशी लिखित संघर्षपर्व कादंबरी साठी, कथा विभागात प्रथम क्रमांक वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टिफन परेरा यांच्या काळवेळ तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार अशोक लोटणकर यांच्या निराधार कथासंग्रहाला.

कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उडवाच मान माझी, तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार विलास गावडे यांच्या व्यक्त होतोय मी या कवितासंग्रहाला, आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृती पुरस्कार आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या क्षण सोनेरी-रुपेरी आणि काटेरी या संग्रहास.

चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार शामसुंदर गावकर यांच्या भरती - ओहोटी या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. शिल्पा जोशी यांच्या मंगेश पाडगावकरांचे गीत-काव्य या ग्रंथास, तर ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वर्षा कुवळेकर यांच्या सफर खूबसुरत है मंजिलसे या ललित ग्रंथास तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार नितीन तेंडुलकर यांच्या अधिक उंच उडता उडता या साहित्यकृतीस.

बालवाङमय विभागाचा प्र. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या शशा रे सशा या ग्रंथास, संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या कातळशिल्पांच्या पाऊलखुणा तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार रविराज गंधे यांच्या महासागर या ग्रंथास व वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार रेखा कोरे यांच्या महात्मा बसवेश्वर - कृतीतून प्रगतीकडे या ग्रंथास मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT