भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीत तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक निधीचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत बर्तुळात एकच खळबळ उडाली असून या गंभीर आर्थिक अपहार प्रकरणात गुंतलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राम जगनाथ म्हस्के यांना अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हाके यांच्यावर फौजदारी कारवाई व रकमेची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत खोगी ग्रामपंचायतीमध्ये म्हस्के यांनी ग्रामनिधी व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्चा अपहार, निविदा प्रक्रियेत अनियमितता, खोटे धनादेश काढगे, काही ठराविक ठेकेदारांना मर्जीतून कामे देणे, तसेच ठेकेदाराच्या नावाने धनादेश न देता रोखीने रकम काढणे असे गंभीर गैप्रकार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य शाहनवाज इम्तियाज कुरेशी यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रारी अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीच्या प्रक्रियेदरम्यान म्हस्के यांनी गैरहजर राहणे, दफ्तर न सादर करणे, चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य न करणे असे प्रकार केले.
त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा आणि गैरवर्तणूक केल्याचे सिद्ध झाले. कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात म्हस्के यांचा दोष स्पष्टपणे नमूद करण्यात आला. यानंतर ठाणे विधी लेखा कार्यालय आणि कोकण विभागाचे सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांनी स्वतंत्र लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालानुसाम म्हस्के यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे.
स्थानिक निधी लेखा परीक्षणानुसार, १४व वित्त आयोग निधी १६ लाख ७८ हजार ४४ रुपये आणि ग्रामनिधी १० लाख ५५ हजार ३० रुपये असा मिळून एकूण १ कोटी ४० लाख ३० हजार ७३८ रुपये इतक्या निधीचा अपहाम झाल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण रकमेबाबत म्हस्के यांना जबाबदार धरण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी य प्रकरणात कठोर निर्णय घेत भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविद खामकर यांना रक्कम वसुल करण्याचे, जप्तीची प्रक्रिय राबविण्याचे आणि फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच म्हस्ये यांच्या विरोधात पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयाम करण्याचे निर्देशही दिले गेले आहेत.
बडतर्फीच्या निर्णयामुळे भिवंडी तालुक्यातील खळबळ
या प्रकरणात झालेल्या बडतर्फीच्या निर्णयामुळे संपूर्ण भिवंडी तालुक्यातील पंचायत यंत्रणेत खळबळ उडाली आहे. अनेक ग्रामपंचायतीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात यामुळे जबाबदारीची जाणीव आणि दक्षतेचा इशारा निर्माण झाला आहे. नागरिकांच्या करातून मिळणारा निधी पारदर्शकपणे वापरला जावा आणि ग्रामविकासाच्या कामांत पारदर्शकता राहावी, यासाठी ही कारवाई आदर्श ठरणारी असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेने या प्रकरणातील निधी वसुली बाबतची कार्यवाही लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हस्के यांच्याकडून रकमेची वसुली न झाल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी सांगितले. या प्रकरणामुळे पंथायत प्रशासनात प्रामाणिकतेचे आणि पारदर्शकतेचे नवीन निकष निर्माण होतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.