खारेगाव उड्डाणपुलावर दोन वाहनांची धडक pudhari photo
ठाणे

Thane road accident : खारेगाव उड्डाणपुलावर दोन वाहनांची धडक

अपघातात दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्याच्या कळवा खारेगाव येथील स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपुलावर रिक्षा आणि हुंदाई वेरना कारची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना सोमवारी पहाटे 5-42 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत रिक्षा चालक गोविंद पवार(43) आणि प्रवासी प्रथमेश चव्हाण (32) असे दोघे जखमी झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सोमवारी पहाटे रिक्षा चालक कळवा पूर्व येथून रिक्षात एक प्रवासी घेऊन निघाले होते. तर हुंदाई वेरना ही प्रथमेश चव्हाण हे कारने जाताना समोरासमोर दोन्ही वाहनांची टक्कर झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खारेगाव पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 01-पिकअप वाहनासह उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT