खडवलीत रस्त्यांवर खड्डेच खड्डे  pudhari photo
ठाणे

Khadavali potholes issue : खडवलीत रस्त्यांवर खड्डेच खड्डे

अपघातांचा धोका वाढतोय

पुढारी वृत्तसेवा

खडवली : खडवलीमध्ये रस्त्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्डे हे अपघातांना निमंत्रण देत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

खडवली येथून महामार्गाला जोडणाऱ्या नदीलगतच्या मुख्य रस्त्यावर सध्या खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. विशेषतः दुचाकी व चारचाकी चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, अनेक ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रोज कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवासी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहनांची पलटी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष घालून या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT