KDMC Pudhari
ठाणे

KDMC alliance politics : केडीएमसीत मनसेला गटनेते पद नाही, मनसेला धक्का की, मनसेची खेळी?

कोकण विभागीय आयुक्तांना नवे पत्र

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : केडीएमसीत शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिके गटनेत्या संदर्भात पाठविलेल्या पत्रात मनसेच्या गटनेत्याचा उल्लेख होता. मात्र आत्ता पुन्हा एक पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी पाठविले ज्यामध्ये पालिकेत निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिघा पक्ष सदस्यांचा हा शिवआघाडी गट असून या गटाचे शिवसेनेचे विश्वनाथ राणे हे गटनेते असल्याचे नमूद केल्याने महापालिकेत मनसेचा गटनेता पद मिळणार नसल्याने मनसेला हा धक्का आहे की, मनसेची ही खेळी आहे ? या संदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.

भाजपने काही दिवसापूर्वी स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली. त्यानंतर शिवसेना आणि मनसे एककत्रित राहावे यासाठी गटनेते पदाचा त्याग केला आहे का? असे देखील चर्चा केली जात आहे.

केडीएमसीत शिवसेना भाजप मनसे आणि राषट्रवादी शरद पवार गटाची युती आहे. शिवसेनेचा महापौर तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. आत्ता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन मोठ्या पदांकरीता चर्चा सुरु आहे. या संदर्भात भाजप नेत्यांनी बैठक घेतली. या दोन्ही पदावर दावा ठोकाला आहे. त्यानंतर शिवसेना भाजपच्या या मागणीचा विचार करणार का असा सवाल उपस्थित झाला होता.

मात्र शिवसेनेच्या गटाचे संख्याबळ पाहता शिवसेना शिंदे गट आरामात स्थायी समिती सभापती पदी आपला सदस्य बसवू शकतो. शिवआघाडीत एकूण 59 नगरसेवक आहे. ठाकरेच्या तीन नगरसेवकाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. ही संख्य 62 हेोते. त्यामुळे शिवसेना शिदे गट आणि मनसेच्या वर्चस्व राहणार आहे. मनसेची शिवसेने सोबत युती आहे हे अस्पष्ट आहे. कोणत्या दगा फटका होऊ नये यासाठी मनसेने ही खेळी केली याची चर्चा आहे.

महापालिकेची निवडणूक पार पडली. निकाल लागला. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. भाजपने 50 नगरसेवकांचा गट स्थापन केला. तर शिंदे सेनेचे 53, मनसेचे 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 असा एकूण 59 नगसेवकांचा शिवआघाडीचा एक गट स्थापन झाला. उद्धव सेनेने 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला. कॉग्रेस पक्षाने 2 सदस्यांचा गट स्थापन केला. गट स्थापनेच्या सुरुवातीलाच मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला.

प्रत्येक पक्षाने गटनेतेही निवडले गेले. भाजपने शशिकांत कांबळे, शिंदे सेनेने विश्वनाथ राणे, उद्धव सेनेने उमेश बोरगांवकर आणि कॉग्रेसचे कांचन कुलकर्णी यांना गटनेते निवडले. मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला असताना मनसेने प्रल्हाद म्हात्रे यांना गटनेते पद दिले. आत्ता शिवआघाडीचा गट स्थापन झाल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना पाठविले.

शिवआघाडीत सहभागी असलेल्या शिंदे सेना, मनसे आणि राष्टरवादी शरद पवार यांच्यापैकी कोणत्याही एका नगरसेवका गटनेते पदी राहता येईल. त्यानुसार शिंदे सेनेने गटनेते पदी राणे यांची निवड केली आहे. त्यामुळे शिव आघाडीत सहभागी झालेल्या मनसेला गटनेते पद देता येणार नाही. शिवआघाडीमुळे मनसेचे गटनेते पद बाद झाले आहे. त्यामुळे या पूढे मनसेला शिंदे सेनेच्या अर्थात शिवआघाडीच्या गट नेत्याचा पक्षादेश पाळावा लागणार आहे. शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने मनसेला गटनेते पदावर पाणी सोडावे लागले आहे.

16 मार्च रोजी महापालिकेची महासभा आहे. या महासभेत स्थायी समितीचे 16, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीचे प्रत्येकी 11 सदस्य नियुक्त केले जाणार आहे. मनसेने गटनेते पदावर पाणी सोडावे लागले. आत्ता या तिन्ही समितीमध्ये मनसेला प्रतिनिधीत्व मिळते की नाही ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT