Kalyan Dombivli Municipal Corporation (Pudhari File Photo)
ठाणे

KDMC Property Tax | मालमत्ता कर थकविणे महागात पडणार; केडीएमसीकडून जप्ती वॉरंटपूर्व नोटिसा!

केडीएमसीच्या कर निर्धारण व संकलन विभागाचा इशारा 

पुढारी वृत्तसेवा

KDMC Property Tax Defaulters

डोंबिवली : मालमत्ता कराचा भरणा वेळेत न केलेल्या थकबाकीदारांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने जप्ती वॉरंट पूर्व सूचना पाठविल्या असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये मालमत्तांची नळ जोडणी खंडीत करणे, दंड/व्याज आकारण्यापासून मालमत्ता अटकावणी, जप्ती आणि त्याची लिलाव प्रक्रिया करण्यात येईल, याबाबतची व्यापक प्रसिद्धीही दिली जाईल, असा इशारा कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.

या संदर्भात उपायुक्त चव्हाण यांनी तातडीचे परिपत्रक जारी केले आहे. विहीत वेळेत कर न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरमहा २ टक्के दंड व्याज देयक रकमेवर आकारला जातो. त्यामुळे थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कर भरण्यामध्ये हयगय करु नये.

कर भरणा एकरकमी केल्यास सन २०२६-२०२७ या वर्षातील दुसऱ्या सहामाही मालमत्ता कराच्या रकमेवर ४ टक्के, तसेच ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास २ टक्के अतिरिक्त सवलत दिली आहे. थकबाकीदारांना घरबसल्या कर देयक महानगरपालिकेच्या http://www.kdmc.gov.in या वेबसाईटवरून तसेच देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करून भरता येईल.

थकबाकीदार यादीतून आपले नाव वगळण्यासाठी आजच थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT