KDMC Water Cut | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी: दर गुरूवार ते शुक्रवार २४ तास पाणी पुरवठा बंद 

पाणी पुरवठा बंद असलेल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी महापालिकेमार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार नाही
Kalyan Dombivli 24 Hour Water Supply Shut
Kalyan Dombivli 24 Hour Water Supply Shut Pudhari
Published on: 
Updated on: 

Kalyan Dombivli 24 Hour Water Supply Shut

डोंबिवली : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात झालेली घट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यातील जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही पाणी कपात करण्याचे ठरले आहे. दर गुरूवार ते शुक्रवारदरम्यान २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

जलसंपदा विभागाने कळविल्यानुसार या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात झालेली घट व अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीपर्यंत राहणार असल्याने राज्यातील जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या उपाययोजना व उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.

Kalyan Dombivli 24 Hour Water Supply Shut
Kalyan Dombivli Municipal News: KDMC उद्यान विभागाच्या खर्चावर संशय; तीन वर्षांत २.३९ कोटी, तर एका वर्षात २५ कोटींचा खर्च

बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावे यासाठी शासन निर्णयाप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामिण विभाग मांडा टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामिण विभागातील इतर गावे व डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरास होणारा पाणी पुरवठा गुरूवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणी पुरवठा बंद राहील.

तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातील दर गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा बंद असलेल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी महापालिकेमार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार नाही. कल्याण-डोंबिवलीकरांनी पाण्याचा आवश्यक तितकाच पाणी साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे आणि कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.