KDMC Committee Elections 2026 Pudhari
ठाणे

KDMC Committee Elections 2026: केडीएमसी सभापती निवडणुकीवर राजकीय रणधुमाळी होणार

साताऱ्यातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; सेना भाजपकडून आकडेवारीची जमवाजमव

पुढारी वृत्तसेवा

सतीश तांबे

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) विविध महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका येत्या सोमवार, दि. 6 एप्रिल 2026 रोजी होणार असून, या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. नुकत्याच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या घटनांमुळे केडीएमसी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती, पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुर्नवसन समितीच्या सभापती पदाची निवडणुक येत्या सोमवारी 6 एप्रिल रोजी विशेष सभेत घेतली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती, पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापती आणि महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुर्नवसन समितीच्या सभापती पदाच्या निवडीची निवडणूक येत्या सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत पार पडणार आहे.

या सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 2 एप्रिल रोजी संबंधित समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक लढु इच्छिणाऱ्या समितीच्या सदस्यांनी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे पाच वाजे पर्यंतच्या कालावधीत आपले नामनिर्देशन पत्र महापालिका सचिव यांचे कार्यालयात सादर करावयाचे आहे.

साताऱ्याच्या गोंधळाची छाया

अलीकडेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष येथे अध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ, घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, केडीएमसीतील निवडणुकीतही अशाच प्रकारचा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साताऱ्यातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीतील सभापती निवडणूक शांततेत पार पडते की राजकीय संघर्षाला तोंड फुटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारचा दिवस केडीएमसीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

केडीएमसीच्या सत्ता वर्चस्वाचा अश्वमेध शिवसेना शिंदेगट पुन्हा उधळणार...

1. स्थायी सभापतीआपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने आकडेवारीची जमवाजमव केली आहे. तर भाजपनेही सभापती पदावर आपला दावा केला आहे. भाजपाने ही सभापती पद आपल्याकडे राखण्यासाठी रणनीती आखली आहे. स्थायी समितीत ठाकरे सेनेचा एकमेव सदस्याचे मत निर्णायक ठरणार असल्याने सदस्य फोडाफोडीची शक्यता असल्याने साताऱ्याच्या गोंधळाची पुनरावृत्तीच्या गडद छायेचे ढग पालिकेवर घोंघावत असल्याचे दिसून येत आहे.

2. या समितीत असलेल्या सोळा सदस्यांमधील आठ सदस्य शिवसेना शिंदे गटाचे तर सात सदस्य भाजपाचे असून उर्वरित एक सदस्य शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा आहे. भाजपाने शिंदे गटाला सभापती पदासाठी शिंदे गटाला समर्थन न देता आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून उद्धव सेना पक्षाच्या सदस्याची मदत घेतल्यास शिवसेना शिंदे गट व भाजपाकडे समसमान आठ सदस्यांचे बलाबल होऊन सभापतीपदाची निवडा टाय होऊन चिठ्ठी उडवून सभापती बनला जाईल, असे अभ्यासकांच मत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT