कल्याणातील सहजानंद चौकात सोलार हायमास्टचे लोकार्पण केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. pudhari photo
ठाणे

KDMC solar high mast : केडीएमसीच्या ताफ्यात तिसरा सोलर हायमास्ट

कल्याणच्या सहजानंद चौकातील हायमास्टचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शाश्वत विकास यावर भर देऊन शहरांचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीमधून कामे हाती घेण्यात यावी.

त्यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त गोयल यांचे धोरण आहे. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करून दिला आहे.

सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी रात्री आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विद्युत/यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उपअभियंता भागवत पाटील, मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व अरीया हेड तरण कोहली उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधीमधून उभारण्यात आले आहेत. यात कल्याण पश्चिमेकडे असलेल्या गंधारे येथील गणपती चौक, डोंबिवली पूर्वेकडे असलेला इंदिरा चौक आणि कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत.

141 चौकांत सोलार हायमास्टचा लवकरच उजाळा

सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही. तसेच महावितरण कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर सुद्धा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील. त्यामुळे चौक प्रकाश राहणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील 144 पैकी उर्वरित 141 साधे हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT