ठाणे

कल्याण: स्वयंपाक करताना कपड्यांना आग लागून महिला गंभीर जखमी

अविनाश सुतार

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : स्वयंपाक करताना कपड्यांना आग लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना आज (दि.१) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. ही महिला ८० टक्के भाजली असून या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत घरातील प्रापंचिक साहित्य जळून नुकसान झाले. कल्याण पूर्व येथील रौनक सिटी येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अग्निशमन दलाच्या बंबानी तत्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.

रौनक सिटी येथे रचना कौशल नावाची एक वयोवृद्ध महिला तिच्या पतीसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. पती कामावर गेले होते. तर ही महिला दुपारी दोनच्या सुमारास घरात एकटीच होती. दरम्यान स्वयंपाक करत असताना अचानक तिच्या कपड्यांनी पेट घेतला. इमारतीतील रहिवाशांना ही घटना कळताच त्यांनी या महिलेचे जळते कपडे काढत तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, याच जळत्या कपड्यांमुळे घरातील वस्तूंनी पेट घेतला. धूर येत असल्याचे रहिवाशांना लक्षात येताच इमारतीतील रहिवासी इमारती खाली येऊन उभे राहिले. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि दोन बंब वेळेत दाखल झाल्याने दोन तासात आग आटोक्यात आणली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT