Vaccination Awareness Campaign Pudhari
ठाणे

Vaccination Awareness Campaign: कल्याण पश्चिमेत ‌‘लस कल्याणाची‌’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

योगेश गोडे

सापाड: कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर बस्ती परिसरात ‌‘लस कल्याणाची‌’ या लोकसमूहातून साकारलेले लसीकरण उपक्रमांतर्गत जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

समाजात लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये लसीकरणा- विषयीचे गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लहान बालकांचे लसीकरण वेळेत पूर्ण करून समाजात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती मोहिमेचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर परिसरात करण्यात आले होते.

अचिवर स्कूलजवळ आयोजित या चर्चसत्रात सुमारे 30 नागरिकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण चर्चसत्रात सहभागीं महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. या चर्चा सत्रात लसीकरणाचे महत्त्व पटवून देत “अफवा विरुद्ध वास्तव” यावरील प्रश्न उत्तरांचा टाक्स तसेच पालक आणि सामाजिक भूमिकेवर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात शोभा यांनी स्वागत करून प्रास्ताविकाने केली. त्यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देत बालकांना गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी वेळेवर लसीकरण किती आवश्यक आहे याचे स्पष्टीकरण केले. त्यानंतर रहीम यांनी ‌‘लस कल्याणाची‌’ मोहिमेचा आढावा घेत उपक्रमाशी जोडल्या जाणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या याबाबत माहिती दिली.

तसेच ‌‘लस कल्याणाची‌’ व्हॉट्सॲप चॅनेलची माहिती देत नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या चर्चासत्रात जनजागृती मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या मार्गदर्शक सुनंदा मराठे व श्रद्धा ताडगे यांनी चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्वतःची ओळख करून देत लसीकरणाविषयी माहिती दिली व विविध उपक्रमांद्वारे नागरिकांशी संवाद साधला. “अफवा विरुद्ध वास्तव”, प्रश्नोत्तर सत्र आणि क्विझच्या माध्यमातून लसीकरणाशी संबंधित गैरसमज दूर करून लसीकरणाचे महत्व पटवून दिले.

छुटे ना टीका एक भी बार

चर्चासत्राज शेवटी सर्वांनी एकत्रितपणे “5 साल 7 बार, छूटे ना टीका एक भी बार” हा गगन भेदी नारा देत संपूर्ण लसीकरणाचा संदेश घरोघरी पोहोचवला. सरतेशेवटी लसीकरण जनजागृती मोहिमेतून उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. चर्चासत्रात सहभागी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून उपस्थितांना प्रोत्साहनपर भेटवस्तूंचे वाढल्याचे सुद्धा जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून दिसून आले आहे.

लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर

या चर्चासत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला . लसीकरणा विषयी वाढलेली जागरूकता पाहता सध्या नागरिकांमध्ये लसीकरण ही जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‌‘लस कल्याणाची‌’ मोहिमेचा प्रभाव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सकारात्मकदृष्ट्या अंगीकृत झाल्याचे स्पष्ट जाणवला. बालकांना वेळेवर लसीकरणासाठी हा महत्वाचा उपक्रम झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी मीडियाच्या माध्यमातून बजावत असल्याने समाजात लसीकरणाविषयाचे गैरसमज दूर झाले असून बालकांमध्ये लसीकरणाचा टक्का वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT