Kalyan Crime Pudhari
ठाणे

Kalyan Railway Assault Case: कल्याणच्या रेल्वे यार्डात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; काही तासांतच नराधम आरोपीला बेड्या

काही तासांतच लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या नराधम आरोपीला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण रेल्वे जंक्शनवर मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत रेल्वे यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली. या मुलीने नराधमाच्या तावडीतून निसटून लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्परता दाखवत पसार झालेल्या बलात्काऱ्याला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकून गजाआड केले.

सौरभ संतोष सोनवणे (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थ नगरमध्ये राहणाऱ्या सौरभला कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 14 वर्षीय मुलगी अहिल्यानगरहून मामाला भेटण्यासाठी निघाली होती. कल्याणहून तिला खोपोलीला जायचे होते. खोपोलीला जाण्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनच्या प्रतीक्षेत होती.

तिच्यावर सौरभची वाईट नजर पडली. त्याने तिच्याशी जवळीक साधून बोलायला सुरुवात केली. त्याने या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकाराने मुलगी भयभीत झाली. तिने त्याच्याकडे मोबाईल मागितला.

मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी धमकी दिली. ओळखपाळख नसलेल्या या बदमाशासोबत ही मुलगी प्लॅटफॉर्मवरून चालत होती. त्यानंतर अर्ध्या वाटेत आल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी हा बदमाश तिला रेल्वे यार्डात घेऊन गेला. निर्जनस्थळ असलेल्या रेल्वे यार्डात नेऊन त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

नराधमाच्या तावडीतून या मुलीने कशीबशी सुटका करवून घेतली आणि ती लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचली. स्वतःवर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तिला धीर दिला.

त्यानंतर मात्र वेळ न दवडता वपोनि कांदे यांनी गुन्हा नेोंदवून निवडक पथकाला आरोपीचा शोध घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांच्या आत आरोपीला शोधून काढण्यात यश मिळविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT