Kalyan Police Drug Seizure Pudhari
ठाणे

Kalyan Police Drug Seizure: अमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध झीरो टॉलरेंस मॉडल

कल्याण विभागाने 6.36 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून रचला विक्रम

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : एकीकडे शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे तरुणांना अमली पदार्थांच्या गैरवापरापासून वाचवण्याची जबाबदारी या दोन्ही आघाड्यांवर कल्याण पोलिसांनी 2025 मध्ये आक्रमक धडक कारवाईचा बडगा उचलल्याने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान कल्याण विभागाने 6.36 कोटी रुपयांचे ड्रग्ज, गांजा आणि कोकेन जप्त केले, ज्यामुळे ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या कल्याण विभागाने केवळ ड्रग्ज व्यापारावर कारवाई सुरू केल्याने गुन्हेगारी तपास आणि शोधातही अव्वल स्थान मिळवले आहे. या मध्ये 101 गुन्ह्यांमध्ये 146 गुन्हेगारांना अटक केली आहे. वर्षभर चालाविलेल्या या मोहीमत 2025 मध्ये 101 एनडीपीएस गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये 146 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे 6.5 कोटी रुपये आहे. पोलिसांच्या मते, ही कारवाई केवळ लहान मालवाहतुकी पुरती मर्यादित नव्हती; पुरवठा साखळी विस्कळीत करण्यासाठीही एक रणनीती राबवण्यात आली.

संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत खारखापाडा आणि महात्मा फुले पोलिस स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या दोन टोळ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांचा दावा आहे की या कारवाईमुळे स्थानिक ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. ड्रग्ज विरोधी पथकाचे प्रमुख एपीआय गायकवाड, पीएसआय जितेंद्र ठोके, राहुल शिंदे, देवरे आणि अमित शिंदे यांच्या पथकाने सुनियोजित सापळा रचला आणि तस्करांवर कारवाई केली. याव्यतिरिक्त, सतत देखरेख, माहिती देणारे नेटवर्क आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे, पुरवठादारांना ओळखले गेले आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

8 पोलीस ठाण्यांची समन्वित रणनीती

कल्याण विभागात एकूण 8 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. खारखापाडा, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी (कल्याण), मानपाडा, रामनगर, टिळकनगर आणि विष्णुनगर (डोंबिवली). या सर्व ठाण्यांमधील वरिष्ठ निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. केवळ अमली पदार्थ विरोधी कारवाईतच नव्हे तर कल्याण विभागाने एका वर्षात 3,000 हून अधिक प्रकरणे सोडवून उच्च दर्जाची तपास क्षमता देखील प्राप्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हे यश अथक प्रयत्न, शिस्तबद्ध तपास आणि जलद कारवाईचे परिणाम आहे. डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, अंमली पदार्थां विरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि कल्याण-डोंबिवली मध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांना कधीही वाढू दिले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT