कल्याणमध्ये घरखरेदीच्या नावाखाली 5 लाखांचा गंडा pudhari photo
ठाणे

Thane Crime : कल्याणमध्ये घरखरेदीच्या नावाखाली 5 लाखांचा गंडा

फसवणूक झालेली महिला पालघरमधील

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बेकायदा बांधकामांची बजबजपुरी झालेल्या कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडिवली-ढोकळी परिसरात पालघर जिल्ह्याच्या मनोरमधील रहिवासी महिलेची घर खरेदीच्या नावाखाली त्या भागातील कथित चाळमालक यादव बंधूंनी पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे.

घर खरेदीसाठी भरलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावणाऱ्या या महिलेला कथित चाळ मालकाने हात-पाय तोडण्याच्याही धमक्या दिल्या. अखेर व्यथित झालेल्या या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पालघर जिल्ह्याच्या मनोर रोडला असलेल्या गणेशनगरमधील हेली सोसायटीत राहणाऱ्या कविता संतोष यादव (41) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी आडिवली-ढोकळीतील संतोष भरत यादव, ब्रिजेश यादव, सुनील यादव, कृष्णा यादव आणि रंजीत सिंग यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी या पाच जणांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कविता यादव यांनी आडिवली-ढोकळीतील साईसेजल चाळीतील खोली आणि गाळा पसंत पडल्याने कविता यादव यांनी रोख आणि धनादेशाद्वारे यादव आणि सिंग या चाळमालकांना दिले. त्यानंतर कविता आणि त्यांचे पती यांनी खोली आणि गाळ्याचा ताबा दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT