कल्याण : कल्याण पूर्वे कडील रेल्वेच्या गोदामात जमा होणार्या नामांकित कंपनीच्या सिमेंट च्या बॅग मध्ये निष्कृष्ट दर्जाचे सिमेटची भेसळ करून विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्कृष्ट दर्जाचे सिमेंट ची भेसळ करून नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करण्याचा गोरखधंदा करणार्या कंपनीचा जागरूक नागरिकानी पर्दाफास करून पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ छापा मारून भेसळ युक्त सिमेंट ने भरलेले चार ट्रक सह चार लाखाचा माल जप्त केला.
बनावट वस्तू तयार करून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी खाद्य पदार्थांचे देखील बनावट पदार्थ तयार करून ते नामांकित कंपनीच्या पॅकिंगमध्ये भरून विक्री केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. आता अशाच प्रकारे बनावट सिमेंट तयार करण्याचा प्रकार कल्याण पूर्वमध्ये उघड झाला आहे. कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डात सिमेंट चे गोडाऊन असून बाहेरच्या राज्यातील सिमेंट कंपनीतून रेल्वेच्या मालवाहू गुड व्हेगेन मधून सीमेटच्या पोतीच्या पोत्या गोडाऊन ठेवले जाण्याची व्यवस्था आहे .
या परिसरात असलेल्या एका सिमेंट कंपनीतून नामांकित कंपनीच्या सिमेंटच्या पिशवीत अन्य कंपनीचे निकृष्ट दर्जाचे सिमेंटची मिलावट करून भेसळ केलेले सिमेंट पॅकिंग करून या ठिकाणाहून ते वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जात असल्याचा गोरखधंदा सुरू होता.विशेष म्हणजे या निष्कृष्ट दर्जाच्या सिमेंटला चाळण मारून पुन्हा सीलबंद करण्याचा उद्योग याठिकाणी सुरू होता या गोरखधंद्याची माहिती जागरूक नागरिकांना मिळताच त्यांनी या गैरकृत्या बाबत कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी या बनावट कंपनीत छापा मारून चार ट्रकसह लाखो रुपयांचे निकृष्ट सिमेंट जप्त केले.
बनावट सिमेंट देशभरात वितरित
सदरची जागा हि नरेश मिश्र आणि ही कंपनी उल्हासनगरमधील नवीन भाटिया नामक व्यक्तीची असल्याची माहिती तेथे काम करत असलेल्या कामगारानी दिली आहे. सदरचे बनावट सिमेंट राज्यात व देशभरात वितरित केले जात होते अश्या निष्कृष्नाठ दर्जाच्या सीमेटच्या वापरामुळे नागरिकांच्या जीवाताला धोका निर्माण झाला आहे. घर किंवा मोठ्या इमारती उभारताना नामांकित कंपनीच्या सिमेंटचा वापर केला जात असतो. अर्थात घराचे बांधकाम वर्षानुवर्षे चांगले मजबूत राहू शकेल. मात्र या बनावट सिमेंटमुळे बांधलेल्या इमारती कधीही कोसळू शकतात आणि जीवित हानी होण्याची मोठी शक्यता आहे. एक प्रकारे नागरिकांच्या जीवावरचे एक संकटच आहे.