सिनिअर डिव्हीजन स्थलांतरास विरोध pudhari photo
ठाणे

Kalyan court relocation protest : सिनिअर डिव्हीजन स्थलांतरास विरोध

लाल फिती लावून दिवाणी न्यायालयातील वकिलांचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण जिल्हा न्यायालयातील सिनिअर डिव्हीजन तसेच जिल्हा अतिरिक्त न्यायालय अंबरनाथ न्यायालयात हलविण्यात येणार आहे. त्याला वकील संघटनेचा विरोध असून अंबरनाथ न्यायालयात सिनिअर डिव्हीजन स्थलांतरीत करण्याच्या विरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायालयातील वकिलांनी बुधवारी लाल फिती लावून जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

गुरुवारी लाल फिती लावून वकील कामकाज करणार आहेत. वकिलांनी केलेला विरोधाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वकील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कल्याण दिवाणी न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष सुदेश गायकवाड यांनी सांगितले की, अंबरनाथ न्यायालयात कल्याणमधील सिनिअर डिव्हीजन हलविण्यास वकिलांचा विरोध आहे.

अंबरनाथला हे न्यायालय स्थलांतरीत केल्यास वकील व पक्षकारांची गैरसोय होणार आहे. त्याठिकाणी वकील आणि पक्षकारांना पोहोचणे जिकरीचे होणार आहे. अंबरनाथ न्यायालय ज्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी जाण्याकरिता बस, रिक्षा,रेल्वेची सोय नाही. न्यायालय परिसरात चांगल्या उपहार गृहाची सोय नाही. त्याठिकाणी पक्षकार आणि वकिलांना पोहोचणे खर्चिक बाब होणार आहे. त्यामुळे पक्षकार न्याय मिळणे महागात पडणार आहे.

आंदोलनाचा इशारा

सध्या कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जुनी आणि नवी इमारत आहे. त्याठिकाणी विशेष पोक्सो न्यायालयासह जलदगती न्यायालय आहे. तसेच दिवाणी आणि फौजदारी खटले चालविले जातात. भविष्यात याच ठिकाणी 21 मजली न्यायालयाची इमारत उभारली जाणार आहे.

56 न्यायालये सुरू होणार आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी सिनिअर डिव्हीजन हलविण्यात काय मतलब आहे. या प्रकरणी वकील संघटनेच्या वतीने जिल्हा मुख्य न्यायाधीशांसह मुंबई न्यायालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान वकील संघटनेचा विरोध विचारात घेतला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष सुदेश गायकवाड यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT