मुरबाड : काळु धरणात हात धुवून घेण्यासाठी ग्रामसेवकासह, शिपाई, डाटा ऑपरेटर ते संपूर्ण ग्रामपंचायत अडचणीत आल्याचे उघड झाले आहे. घराचा ठावठिकाणा नसतांना बोगस बनवलेल्या शेकडो घरपट्ट्या 17 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत रद्द करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात येऊन पुढील कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात काळु धरण होणार ही काळ्या दगडावरची रेघ असून, या धरणबाधितांना शासकीय मदत मिळणार असल्याने आपल्यासह, सग्यासोय-यांना शासनाकडून कसे लुटता येईल याचे उत्तम उदाहरण सध्या चासोळे ग्रामपंचायतीत उघडकीस आले आहे. घराचे बांधकाम अस्तीत्वात नसतांना तीनशेहून अधिक घरपट्ट्या ग्रामपंचायतीने वाटप केल्याचे रेकॉर्डवर दिसून येत आहे.
यात ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, शिपाई व काही ग्रामपंचायत सदस्य, गावातील नेते यांच्या घरपट्ट्या भरणा करून शासकीय भरपाई लाटण्याचा डाव काही जागृत ग्रामस्थांनी उघडकीस आणल्यावर यात नातेवाईक ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, शिपाई , गावातील प्रमुख नेते यांच्या नातेवाईकांच्या नावावर घर नाही पण घरपट्टी आढळून आलेल्या असून बोगस घरपट्ट्यांची नोंद करणारा व आपल्या कुटूंबातील नातलग अशाच प्रकारे भोरांडे उदाळडोह या ग्रामपंचायतीत बोगस घरपट्या घुसविल्याप्रकरणी माजी पंचायतराज राज्यमंञी कपिल पाटील यांनी पुराव्यानिशी तक्रार केली.
चौकशीत दोषी आढळलेले ग्रामसेवक लकिचंद पाटिल याला तात्काल निलंबित करण्यात येऊन ग्रामपंचायत अधिनियम 1958कलम (39)1 अन्वय ठाणे जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आदेशा नुसार कारवाई करण्यात आली आहे.
भोरांडे ग्रामपंचायत प्रमाणाचे चासोळे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या या बोगस घरपट्टयांची चौकशी करून ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, शिपाई व जे इतर कोण असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जयवंत थोरात व अरुण राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असून, मा.राज्यमंञी कपिल पाटील हे देखील या कारवाईसाठी पाठपुरावा करीत आहेत.