मुरबाड, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ५० टक्के तिकीटदरात सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात १७ मार्च ते २५ मार्चपर्यंत या एका आठवड्यात जवळपास ३९ हजार महिलांनी या योजनेअंर्गत प्रवास केला. मुरबाड ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुरबाड ग्रामीण भागात जवळपास मुरबाड बसेसचे ५० रूट आहेत. त्या रुटवर सध्या मुरबाड ग्रामीण भागातून बस धावत आहे. तरी महिला सन्मान योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुरबाड आगार प्रमुख योगेश मुसले यांनी केले आहे.
हेही वाचा