JJ Hospital doctor death Pudhari
ठाणे

JJ Hospital doctor death: ‘एमडी‌’च्या स्वप्नांचा अंत मृत्यूत, सरकारी मेडिकल कॉलेज की छळछावणी?

पांढरा कोट, काळा ताण! डॉक्टर वाचवतात जीव...पण डॉक्टरांना वाचवणार कोण?

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या होतकरू तरुणांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आता मरण वाटांवरील महाविद्यालये ठरत असल्याचे संतापजनक वास्तव पुन्हा समोर आले आहे. जे.जे. रुग्णालयातील प्रथम वर्ष रेडिओलॉजी आरएमओ डॉ. अभयसिंह मोरे यांनी 12 मे रोजी अतिताण आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.

एका गुणवंत डॉक्टरचा जीव गेल्यानंतरही व्यवस्था मात्र ढिम्म असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टर घडवणाऱ्या व्यवस्थेचाच रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. जे.जे.तील तरुण डॉक्टरची आत्महत्या म्हणजे अमानवी ड्युट्या, मानसिक छळ आणि विखारी व्यवस्थेने घेतला आणखी एक बळी असेच बोलले जाते.

जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात ता. 12 मे रोजी डॉ.अभयसिंह मोरे या प्रथम वर्ष रडिओलॉजीच्या आरएमओने अतिताणाने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याच्या बातमीने वैद्यकीय क्षेत्रात अतिताण आणि विखारी वागणुकीच्या बळीबाबत खळबळ माजवली. आणि एका होतकरू रेडिओलॉस्जिटला समाज हरवून बसला.

यापूर्वी नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी सारख्या अगदी तळागाळातील उदयोन्मुख गायनाकॉलॉजिस्टला समाज हरवून बसला. तिच्या आत्महत्येनंतर अनेक संघटना एकवटल्या परंतु डॉ. अभयसिंह मोरेे याच्या आत्महत्येबाबत येथील मार्डपण पुढे आली नाही.

अखेर गरिबाला वाली कोणी नाय, असेच म्हणायचे.विषेश म्हणजे या जे.जे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर्षी (सन 2025 )मध्ये दोन आरएमओनी आत्महेत्येचे पाऊल उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. आणि अशा घटना फक्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातच का घडतात याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

वर्षाकाठी 300 आरएमोंची माघारी...

सीनियर डॉक्टरांच्या विखारी वागणूक आणि अतिताणाच्या ड्युट्यांमुळे महाराष्ट्रात वर्षाकाठी जवळ जवळ 300 आरएमओ आपले शिक्षण सोडत आहेत, जवळ जवळ 25 आरएमओ आत्महत्येस कवटाळत आहेत. आणि हे प्रकार देशातील-राज्यांतील सरकारीच रुग्णालयांमध्येत घडत असतात. जिथे फक्त गोररिबांचीच मुले या सरकारी महाविद्यालयात प्रवेशित होतात, कारण खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे नसतात.

परंतु येथील झारीतील शुक्राचार्यांची विखारी वागणूक आणि ड्युट्यांच्या अतिताण यामुळे हा गोरगरिब होतकरून तरुणवर्ग उच्च शिक्षणाच्या पाऊलवाटांवरच बळी पडत आहे. या शिक्षणाच्या जुनाट पद्धतीत प्रशिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांना येथील सीनियर डॉक्टर गुलाम म्हणून पाहतात व त्यांना हरघडीला अपमानाच्या फेऱ्यांना समोर जावे लागते. या सत्याचा मागोवा मा.सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आरएमओंच्या डुयट्यांबाबत निश्चित सेवातालिका निर्देशित केल्या आणि त्याचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत झाले आहे.

24 नाही तर 36-48 तास ड्युट्या!

आठवड्यातू दोन वेळा 24 तास ड्युट्या तर पाच दिवस 12 तास. तेही अनिर्बंध कारण यात कधीही24 तासांची 36 तास तर कधी 12 तासांची 24 तास असा अघोषित ड्युट्यांचा कारनामा सीनियरच्या मनमानीनुसार सुरू असतो. पेशंटसमोर, स्टाफसमोर या आरएमओंचा अपमान केला जातो, वार्डबॉय-शिपायाची कामे त्यांना सांगितली जातात. रक्ताचे नमुने, पेशंटच्या सोनाग्राफीकरिता या आरएमओना घेऊन पाठवले जाणे, चूक नसताना ती मान्य करण्यास लावणे, चार दिवस अगोदरच डिस्चार्ज पेशंटची फाईल तयार कण्यास सांगणे, इन्स्ट्रुमेंटचा ट्रे घेऊन पेशंट टू पेशंट कॅरी करण्यास लावणे, स्वतःची खासगी कामे तसेच मानहानिकारक -गुलामीची वागणूक हे सीनियर देत असतात.

याबाबत लेखी काही नसते. आणि या ड्युटी अवरमध्ये संबंधित आरएमओ ला नास्ता, आंघोळ, प्रातर्विधी, विश्रांती यांचा विचार नसतो, एवढेच काय लेक्चरपासूनही ते रोखतात.विविघ व्याधीग्रस्त पेशंटमध्ये अशा अवस्थेत हे आरएमओ राहिल्याने त्यांचे आरोग्यही बिघडते.

‌‘गुरू‌’ नव्हे तर ‌‘छळकर्ते‌’ ?

वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांतील द्वितीय व त्रितीय वर्षातील वरिष्ठ डॉक्टर म्हणजेच सीनियर होत. यांचे काम-कर्त्यव्य म्हणजे गुरुवर्याची भूमिका बजावणे हे यांचे आद्य कर्त्यव्य असते परंतु जेणेकरून त्यांनी प्रथम वर्षीय ज्युनियर आरएमओंना सैद्धांतिक व प्रत्यक्षिक पातळीवरून आपल्या अनुभवानुसार प्रक्षिशित करणे हे त्यांचे कर्त्यव्य परंतु याबाबात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या ठिकाणी हेल्दी वर्क प्रक्रिया राबविणे राहिले बाजूला अशी विखारी वागणुकीचा सिलसिला चालू असतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

अनिर्बंध 24 तास, 36, 48 तास, सप्ताहात 120-130 तास अशा अमानवी ड्युट्या, सतत पेशंटच्या सान्निध्यात तसेच आंघोळ, नास्ता, विश्रांतीचा अभाव यातून सीनियर डॉक्टरांची विखारी वागणूक याचा तर्कसंगत, यथांसांग सत्यपरिस्थिचा मागोवा घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने आरएमओच्या अमानवी ड्युट्यांच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी सप्ताहात 48 तास ड्युटी तसेच शिफ्ट ड्युटी 12 तासांपेक्षा अधिक नसावी असे आदेश दिले. तसेच महाराष्ट्र सरकानेही राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना या ड्युट्या अंमलबजावणीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, परंतु अजून त्याची अंमलबजावणी होत नाहे, हेही वास्तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT