I‌NS Malwan Warship Pudhari
ठाणे

I‌NS Malwan Warship: ‘मालवण‌’ युद्धनौका नौदलात दाखल; शिवरायांच्या आरमाराचा वारसा म्हणून निर्मिती

शत्रूच्या पाणबुड्यांनाही टक्कर देणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्याच्या वेळी सुतोवाच झालेली मालवण युद्ध नौका अखेर 31 मार्चच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीनंतर भारतीय नौसेनेत दाखल झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने पाणबुडी विरोधी युद्धनौका ‌‘मालवण‌’ असे नाव दिले आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनातील हे एक महत्वाचे पाऊल आहे.

मालवण हे कोकणातील छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी जोडलेले महत्वाचे शहर आहे. म्हणूनच या युद्धनौकेचे नाव मालवण देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली सागरी वारशाशी जोडला गेलेला अध्याय या निमित्ताने पुढे नेण्यात आला आहे.

ही युद्धनौका पूर्वीच्या आयएनएस मालवण या भारतीय नौदलाच्या सुरुंग शोधक जहाजाच्या परंपरेला पुढे नेणारे महत्वाचे पाउल आहे. ही जुनी युद्ध नौका 2003 पर्यंत सेवेत होती. मात्र आता नवी युद्ध नौका नौदलात दाखल झाल्याने शत्रूच्या पाणबुड्यांचीही आता खैर उरणार नाही.

ही युद्धनौका पाण्याखाली पाळत ठेवणे, किनारपट्टीजवळील पाण्यात पाणबुडी विरोधी युद्ध मोहीम राबविणे, कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया आणि सुरुंग युद्ध क्षमतेचा प्रतिकार यासाठी सज्ज करण्यात आली आहे.

सुमारे 80 मीटर लांबी आणि 1100 टन विस्थापन क्षमता असलेली ही युद्धनौका भारताच्या नौदल क्षमतेत महत्वाचे पाउल ठरले आहे. या युद्धनौकेमुळे ट्रॉपेडो बहुउद्देशीय पाणबुडी विरोधी रॉकेट, प्रगत रडार यंत्रणा, सोलार प्रणाली, अत्याधुनिक सेन्सर, अशा संसाधनांनी परिपूर्ण आहे. शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेणे आणि त्यांना निष्क्रीय करण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये आहे.

स्वदेशी युद्धनौका

एएसडब्ल्यू - एसडब्ल्यूसी मालिकेतील ‌‘मालवण‌’ ही दुसरी युद्धनौका 31 मार्च रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी बनावटीची म्हणून आरेखित करून बांधली गेली आहे. एएसडब्ल्यू -एसडब्ल्यूसी मालिकेतील ‌‘मालवण‌’ ही दुसरी युद्धनौका असून ती भारतीय नौदलाच्या निकषांनुसार बांधण्यात आली आहे. 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर या युद्धनौकेत करण्यात आला आहे.

‌‘मालवण‌’ नावामागचा ऐतिहासिक वारसा

या युद्धनौकेला महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील ऐतिहासिक मालवण शहराचे नाव देण्यात आले आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी वारशाशी जोडलेला आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या ‌‘खछड चरर्श्रींरप‌’ या सुरुंगनाशक जहाजाचा वारसा पुढे नेत आहे, जे 2003 पर्यंत सेवेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT