Igatpuri Accident News Update
ठाणे : त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन नाशिकहून मुंबईकडे परतणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे कुटुंब त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून मुंबईच्या दिशेने परतत असताना इगतपुरीजवळील आटगाव येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनाला धडकली आणि हा अपघात झाला.
श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जैस्वाल कुटुंबीय हे मूळचे गोरखपूरचे रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातात कार अक्षरश: चक्काचूर झाला.
अपघातातील जखमींची नावे
सुभी जैस्वाल
शिवम जैस्वाल
हाशिक जैस्वाल
सुनीता जैस्वाल
राधिका जैस्वाल
सतीश जैस्वाल
ब्रेक निकामी झाल्याने अपघात?
ब्रेक फेल होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.