उपमुख्यमंत्री अजित पवार  File Photo
ठाणे

मला मुख्यमंत्री बनवले असते तर सगळी पार्टी आणली असती - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मी विधानसभेत वरिष्ठ आहे. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो, तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितले इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, शेवटी नशिबात असते तेच होते, असा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाण्यात लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील लेखक प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त करीत आजच्या राजकारणात कुणी ढेकूण बोलतोय, कुणी काय बोलतोय,महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील राजकीय संस्कृती राहिली नसल्याची खंत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांनी जवाबदारी घेतल्यावर हा पहिला कार्यक्रम आहे. ठाण्याच्या ऐतिहासिक नगरींत खूप काही घडले. आहे.शेतकरी कुटूंबातील मुलगा या परिसरात येतो काय ? नगरसेवक ते आमदार ते मुख्यमंत्री होतो.काय ? हे तुमचे प्रेम आणि ही एकनाथ शिंदे यांची जिद्दी, चिकाटी होती, शिंदे हे माणसातील मुख्यमंत्री असल्याचा गौरव उद्गार त्यांनी काढले.

मातीशी नाळ जुळलेला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत मी वरिष्ठ आहे. देवेंद्र फडणवीस हे 99 साली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2004 साली पहिल्यांदा निवडून आले. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते दोघेही पुढे गेले. मी मात्र मागे राहिलो. असा मिश्किल टोला लागवताच सभागृहात एकच हसा पिकला. मी गंमतीत म्हणतो एकनाथ शिंदे यांना सांगितले कि तुम्ही इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, अशी कोपरखळली पवार यांनी लगावतच सभागृहात एकच हसा पिकला. पण जे नशिबात असते ते घडते. मातीशी नाळ जुळलेला असलेला व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

मी बरेच मुख्यमंत्री बघितले. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळून सर्व मुख्यमंत्र्यांची नावे घेऊन पवार यांनी एकनाथ शिंदे हे माणसात मिसळून काम करणारा एकमेव मुख्यमंत्री असल्याचे म्हटले. पण सर्वात जास्त लोकांच्या अर्जावर सह्या करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.त्यांनी अनेक संकट झेलली. आज ते राज्याचे प्रमुखपद सांभाळत आहेत. असे पवार म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात जातात. तिथे जाऊन शेती करतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो खूप पाहतो. मी पण बारामतीला गेलो की शेतात जातो, पण आमचे मीडियात फॉलोओवर नसल्याने आमचे फोटो येत नाहीत, असा मिश्किल टोलाही अजित पवार यांनी शिंदे यांना लगावला. याचबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये असलेले माझे सहकारी होते. मीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी दिली होती. यात उदय सामंत, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे,दीपक केसरकर आधीचा समावेश आहे आत्ता मीच तुमच्यासोबत आलो. शेवटी बोलतांना अजित पवार यांनी योद्धा कर्मयोगी या पुस्तकातील चुका ही प्रकाशकांच्या निदर्शनास आणून देत त्या पुढे सुधारण्यांच्या सूचना ही त्यांच्या भाषणातून केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT