विकासकामांमुळे गवळीदेव परिसरात सध्या प्रवेशबंदी आहे. असे असतानाही या ठिकाणी प्रवेश करत पर्यटक अपघातांना निमंत्रण देत आहेत.  Pudhari News Network
ठाणे

Gawlidev Tourist Spot | बंदी असताना ‘गवळीदेव’ला पर्यटकांचे लोंढे; अपघातांचा धोका

विकासकामांमुळे गवळीदेव परिसरात प्रवेशबंदी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गवळीदेव परिसराचा विकास करण्यात येत आहे. येथे सुरु असलेल्या विकासकामांमुळे गवळीदेव परिसरात सध्या प्रवेशबंदी आहे. असे असतानाही या ठिकाणी प्रवेश करत पर्यटक अपघातांना निमंत्रण देत आहेत.

गवळी देव परिसरात विकासकामे सुरु असल्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक परिसर असल्याचे फलक देखील पालिकेकडून लावण्यात आले आहे. तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. येथील धबधब्याच्या ठिकाणी काम सुरु असल्यामुळे दगडांचा ढिग पडला आहे. तर काही ठिकाणी शेवाळ देखील साचले आहे. रस्त्यावरही सर्वत्र खडीची कस पडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बच्चे कंपनीला घेऊन जाणे अत्यंत धोकादायक आहे.

गवळीदेव पर्यटनस्थळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. पण अखेर वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे.

गवळीदेव पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटकांना बंदी आहे. तसेच येथील मुख्य प्रवेशद्वार देखील बंद आहे. तरी हौशी पर्यटक या ठिकाणी जातात. या ठिकाणी काम सुरु असल्यामुळे पर्यटकांनी या परिसरात जाऊ नये.
यशवंत कापसे, कार्यकारी अभियंता,नवी मुंबई महापालिका

पुढील मान्सूनमध्ये पर्यटकांना या ठिकाणाचा आनंद घेता येईल. पण सद्यस्थितीत तेथे प्रवेश करणे हे धोक्याचे आहे. गवळीदेव डोंगरावर प्रवेश करताना माती, खडीतून प्रवास करणे धोकादायक आहे. तर धबधब्याच्या परिसरात देखील मोठे टोकदार दगड आहेत. या दगडांवर शेवाळ साचल्यामुळे पाय घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गवळीदेव परिसरात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. पण काही हौशी पर्यटक या ठिकाणी प्रवेश करून जीव धोक्यात घालत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT