ठाणे

ठाणे : ग्रामीण भागात जत्रांमध्ये जुगाराचे अड्डे वाढले

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात सध्या जत्रांचे उत्सव सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने गावागावात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, या स्पर्धांमध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी खरड येथील जत्रेच्या उत्सवात जुगाराचे अड्डे दिसून आले आहेत. मात्र, याकडे पोलिसाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात जत्रांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. काही ठिकाणी क्रीडा स्पर्धा तर काही ठिकाणी बैलगाडा स्पर्धा सुरू असतात. शुक्रवारी अंबरनाथ तालुक्यातील खरड येथे जुगाराचे अड्डे सुरू करण्यात आले होते. या जत्रेत पोलिसांच्या डोळ्यासमोर तरुणाई जुगाराच्या आहारी जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, सर्रास सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

सततच्या या जत्रांमधील सुरू आलेले जुगाराने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे खरड येथील जुगाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT