रागिणी बैरीशेट्टी यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश 
ठाणे

ठाणे: माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; शिंदे गटाला धक्का

अमृता चौगुले

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे ६४ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. अशा वेळी माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवेत भास्कर बैरीशेट्टी व शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील कार्यकर्त्यांनी ही प्रवेश केला.

बेरी शेट्टी यांच्या शिवसेनेतील वापसीमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला धक्का खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. बेरी शेट्टी ह्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील असून त्यांची पत्नी परिषा सरनाईक यांच्या पॅनल मधील आहेत. त्यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. आणि आता बेरी शेट्टी यांनी ठाकरे गटात प्रवेश करून शिंदे – सरनाईक यांना धक्का दिला आहे.

यावेळी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ओवळा माजीवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उप जिल्हाप्रमुख व प्रवक्ता संजय घाडीगावकर व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT